November 8, 2024 9:45 AM

views 37

झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला

झारखंडमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी काल, एनडीए आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या निवडणूक सभा पार पडल्या. हजारीबाग इथल्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कारभारावर टीका करत नागरिक त्यांच्या चुकीच्या कारभारावर नाखूष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ...

November 8, 2024 2:32 PM

views 35

परराष्ट्र व्यवहारमंत्री सिंगापूरचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार

    भारत आणि आसियान देश यांच्यातलं सहकार्याचं धोरण अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करून आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावता येईल, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी आज सिंगापूर इथं केलं. ते आज आठव्या आसियान इंडिया नेटवर्क ऑफ थिंक-टँक्...

November 7, 2024 8:21 PM

views 46

आठ खनिज खाण लिलावाची प्रक्रिया पूर्ण

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातल्या महत्त्वाच्या आठ खनिज खाण लिलावाची प्रक्रिया आज पूर्ण झाली. या खाणींमध्ये फॉस्फेट, ग्रेफाइट आणि वॅनेडियम ही खनिज  आहेत. ही खनिजं उच्च तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेच्या वाढीसाठी आवश्यक आहेत.   खनिज क्षेत्रात आत्मनिर्भर ह...

November 7, 2024 8:16 PM

views 63

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्य मुख्य निवडूक आयोगाकडे भाजपाविरोधी तक्रार

काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात दिलेल्या गॅरंटी लागू केलेल्या आहेत. मात्र भाजपाने जाणीवपूर्वक त्या गॅरंटी लागू केलेल्या नाही अशा जाहिराती वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्या आहेत. याबाबतीत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपा विरोधात लेखी तक्रार केली. निवड...

November 7, 2024 8:03 PM

views 30

भारत-अमेरिकेची भागीदारी विशेष असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांचं प्रतिपादन

भारत आणि अमेरिकेची भागीदारी बहुआयामी आणि विशेष असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला असून, भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक आणि धो...

November 7, 2024 7:57 PM

views 49

हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर झारखंडची जनता नाखूश – मंत्री अन्नपुर्णादेवी

झारखंडमध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्या प्रचारसभांंचा धडाका सुरु आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर झारखंडची जनता नाखूश असल्याचा दावा जेष्ठ भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री अन्नपुर्णादेवी यांनी हजारीबाग इथं बोलताना केला...

November 7, 2024 7:46 PM

views 37

सरकारी नोकरीची भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियमांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

सरकारी नोकरीची भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याबाबतच्या नियमांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही, असा नियम सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितला आहे. सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायमूर्तींच्या पीठानं स्पष्ट केलं की, भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ठरवलेल्या त्याबाबतच्या ...

November 7, 2024 7:41 PM

views 49

जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब

जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी आज गदारोळ घातला. या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.   उपमुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सुरेंद्र कुमार च...

November 7, 2024 7:07 PM

views 34

विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने प्रचार

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोमाने सुरु आहे. राज्यातल्या दिग्गज नेत्यांसह इतर राज्यातल्या नेत्यांच्या देखील ठिकठिकाणी सभा होत आहेत. औरंगाबाद मध्य मतदार संघात महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी आज मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघात पदयात्रा काढली. महायुतीचे औरंगाबाद पूर्व मत...

November 7, 2024 7:04 PM

views 60

…म्हणून विरोधक महिलांसाठी योजना जाहीर करत आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र आणि राज्य सरकारचं डबल इंजिन महाराष्ट्राचा विकास करत आहे. महाराष्ट्राचा विकास पाहून विरोधकांच्या पोटात दुखलं आणि त्यांनी खटले दाखल केले. परंतु याचा फटका आपल्यालाच बसेल हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता हे विरोधक महिलांसाठी योजना जाहीर करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. अक...