November 9, 2024 10:55 AM

views 28

करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सवास प्रारंभ

करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सवास कालपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीचे चरणस्पर्श करुन थोडी वर सरकत लुप्त झाली. हा अनोखा सोहळा सूर्यास्तापूर्वी काही क्षण अनुभवता येतो. सूर्याची सोनेरी किरणे पहिल्या दिवशी आईच्या चरणावर, दुसऱ्या दिवशी छातीवर...

November 9, 2024 10:46 AM

views 44

पुण्यात येत्या 12 तारखेपासून राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धांचं आयोजन

तीक्ष्ण नजर आणि एकाग्रता ही नेमबाजी या खेळाची बलस्थानं... पण नजरच नसेल तर ? पण तरीही हा खेळ खेळता येऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकही मिळवता येऊ शकतं हे दिव्यांग नेमबाजांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अशीच चमकदार कामगिरी करणाऱ्या दिव्यांगाच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पुण्यात रंगणार आहेत. पुण्यातल्...

November 9, 2024 10:43 AM

views 49

महायुती सरकार वंचितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची धुळ्यातील सभेत ग्वाही

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू असून दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशात कॉँग्रेस जाती विभाजनाचा धोकादायक खेळ खेळत असल्याची घणाघाती टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल धुळे इथल्या प्रचार सभ...

November 9, 2024 10:34 AM

views 54

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी राहणार बंद

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या २० तारखेला मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

November 9, 2024 10:14 AM

views 44

चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार

बीड जिल्ह्यात पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सय्यद कुटुंबियांच्या गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सय्यद हमीद ...

November 9, 2024 10:06 AM

views 63

निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांचं प्रतिपादन

निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत युवकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. जिल्हाधिकारी स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर यांनी...

November 9, 2024 2:28 PM

views 43

मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या विशेष अभियानाचा शुभारंभ

विधानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत करण्यात आला. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. याअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतद...

November 9, 2024 2:30 PM

views 57

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ६१ धावांनी विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. काल डर्बन इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २० षटकात आठ बाद २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अठराव्या षटकात एक चेंडु शिल्लक असतांना १४१ ...

November 9, 2024 6:59 PM

views 51

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार शिगेला

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान १३ नोव्हेंबरला होणार आहे, त्यामुळं तिथं प्रचार संपायला अवघे तीन दिवस उरले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आज झारखंडच्या जमशेदपूरमधील छत्रपूर, हजारीबाग आणि पोटका विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल ग...

November 9, 2024 3:33 PM

views 24

सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार

सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या रविवारी अधिकृतपणे निवृत्त होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा काल न्यायालयात शेवटचा दिवस होता. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या निकालांमध्ये अयोध्या जमीन ...