November 8, 2024 8:31 PM

views 16

मंत्री ज्युएल ओराम यांच्या हस्ते पूर्वोत्तर आदिवासी महोत्सवाचं उदघाटन

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथं होणाऱ्या पूर्वोत्तर आदिवासी महोत्सवाचं उदघाटन झालं. ८ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आदिवासी संस्कृतीच्या, कलाकुसरीच्या तसंच  खाद्य पदार्थांच्या जिनसा प्रदर्शित केल्या जाणार असून त्या माध्यमातून या समाजाची संस्कृती जोपासण्याचा तस...

November 8, 2024 8:26 PM

views 34

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सोपोर भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी काल रात्री संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यानच चकमक सुरू झाली आणि त्यात दहशतवादी ठार झाले, अशी माहिती...

November 8, 2024 8:20 PM

views 56

बिहारला गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी ४४६ विशेष रेल्वे गाड्या

नुकत्याच संपन्न झालेल्या छठ पूजा महोत्सवासाठी बिहारमध्ये गेलेल्या प्रवाशांच्या परतीची सोय करण्यासाठी मध्य-पूर्व रेल्वे विभागानं रेल्वेच्या ४४६ फेऱ्यां सुरू केलं आहे. या फेऱ्यांच्या माध्यमातून बिहारमधल्या नागरिकांना इच्छित स्थळी पोचवलं जाणार आहे. या फेऱ्या आजपासून सुरू होणार असून आगामी  १५ दिवसांच्या...

November 8, 2024 8:15 PM

views 26

अंमलात असलेल्या २०१५च्या वाणिज्यिक न्यायालये कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय

कायदे आणि न्याय मंत्रालयाने सध्या अंमलात असलेल्या २०१५ च्या वाणिज्यिक न्यायालये  कायद्यात  सुधारणा करण्याचा निर्णय घेतला  आहे. हा कायदा व्यावसायिक विवादांच्या प्रकरणांचा शीघ्रगतीनं, कार्यक्षमतेनं तसंच वाजवी खर्चात निपटारा करण्याच्या उद्देशानं संमत करण्यात आला होता. पण सरकारनं आता या कायद्यात सुधारणा...

November 8, 2024 8:11 PM

views 8

मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते वैद्यकीय उपकरण उद्योग बळकटीकरण योजनेचा आरंभ

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत वैद्यकीय उपकरण उद्योग बळकटीकरण योजनेचा आरंभ केला. यावेळी रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि औषधनिर्माण सचिव अरुणिश चावला उपस्थित होते. या योजनेमुळे मोठा फायदा होणार असून त्याचा दीर्घकाळ प्रभाव राहील, असं मत नड्डा यांनी व...

November 8, 2024 8:04 PM

views 24

भाजप आदिवासींकडून जल, जंगल, जमीनीवरचा हक्क हिरावून घेत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

भारतीय जनता पक्ष आदिवासींकडून जल, जंगल, जमीनीवरचा हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सिमदेगा इथं आयोजित प्रचारसभेत आज ते बोलत होते. झारखंडची निवडणूक म्हणजे इंडिया आघाडीचं भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्वज्ञानाविरुद्धचं युद...

November 8, 2024 7:40 PM

views 60

राष्ट्रवादी काँग्रेसची बंडखोर पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या आठ पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पक्षाची आणि महायुती सरकारची प्रतिमा मलीन केल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. बापू भेगडे, कृष्णा अंधारे, विश्वंभर पवार, पूजा व्यवहा...

November 8, 2024 7:14 PM

views 25

महाविकास आघाडीनं महायुतीचं मोठं नुकसान केलं – पंकजा मुंडे

लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी खोटा प्रचार करत  मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून महाविकास आघाडीनं महायुतीचं मोठं नुकसान केलं असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं केला. महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत त्या बोल...

November 8, 2024 7:10 PM

views 64

कोकणात बदल हवा असेल, तर मनसेच्या उमेदवारांना स्वीकारा – राज ठाकरे

'कोकणात बदल हवा असेल, तर आतापर्यंत ज्यांना मतदान करत आला आहात त्यांना नाकारा आणि मनसेच्या उमेदवारांना स्वीकारा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. ते आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर इथल्या पाट-पन्हाळे इथं प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मनसेचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

November 8, 2024 7:03 PM

views 35

शिवरायांचा पुतळा उभारताना महायुतीनं भ्रष्टाचार केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना महायुती सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा इथं केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारसभेला ते संबोधित करत होते. महाविकास आघाडीनं गेल्या काही काळात विकासकामं केली. प...