November 30, 2024 2:41 PM

views 46

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज अरुणाचल प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. दोइमुख इथल्या राजीव गांधी विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षान्त समारंभाचे ते प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमानंतर ते इटानगर इथं अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.

November 30, 2024 2:39 PM

views 34

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. मधुबनी जिल्ह्यातल्या क्रेडिट आऊटरीच कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी त्या संवाद साधतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्या स्वयं अर्थसहाय्यता गट, रोजगाराभिमुख योजना आ...

November 30, 2024 3:25 PM

views 36

राज्यात नोव्हेंबर महिन्यातच गारठा वाढला

राज्यात नोव्हेंबर महिन्यातच थंडीची तीव्र लाट पसरली आहे. पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सर्वाधिक गारवा जाणवत असून जिल्ह्यांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा कमी राहिलं. येत्या तीन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. रा...

November 30, 2024 2:31 PM

views 44

बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत – भारत सरकारचं आवाहन

बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत, असं आवाहन भारत सरकारनं केलं आहे. हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक नागरिकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि त्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर होणारे हल्ले, हे मुद्दे भारतानं प्रकर्षानं मांडल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे ...

November 30, 2024 2:29 PM

views 50

राजधानी दिल्लीत काही भागांत हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी ४०० अंकांवर

राजधानी दिल्लीत आजही हवेचा गुणवत्ता स्तर खूप खालावलेला आहे. सकाळी ७ वाजता हवा गुणवत्ता निर्देशांकांची सरासरी ३४८ इतकी नोंदवली गेली. शहराच्या काही भागांत हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी ४०० अंकांवर गेली आहे. पुढचे दोन दिवस दिल्ली आणि एनसीआर भागात रात्री आणि पहाटेच्या वेळी धुरकं राहील, अशी शक्यता भार...

November 30, 2024 1:50 PM

views 43

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये होणार

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये खेळला जाणार आहे. महिला एकेरीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधु हिचा सामना उन्नती हुडा हिच्याशी होईल. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची लढत जपानच्या शोगो ओगवा याच्याशी तर प्रियांशु राजावत याची लढत सिंगापोरच्या जिया हेंग जेसन तेह याच्या...

November 30, 2024 1:34 PM

views 54

संसदेत विरोधी पक्षाच्या मागण्या स्वीकारल्या जात नसल्यामुळे संसदीय लोकशाहीचं पालन होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका

संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मागण्या स्वीकारल्या जात नाहीत, याचा अर्थ देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नाहीय, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. हे योग्य नसून यासाठी लोकांमध्ये जाऊन जागृती घडवून आणण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. निवडणुकीच्या न...

November 30, 2024 11:52 AM

views 74

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आज गुजरात दौऱ्यावर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरतमधील किम इथं बुलेट ट्रेन ट्रॅक स्लॅब निर्मिती केंद्राला ते भेट देतील.   वडोदरा इथल्या प्लासेर इंडिया कारखान्यालाही मंत्री महोदय भेट देतील. त्यानंतर ते वडोदरा इथल्या गति शक्ती विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्ष...

November 30, 2024 11:50 AM

views 46

प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांची चंदीगढ च्या दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राला भेट

प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी काल चंदीगढ च्या दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राला भेट दिली. दोन्ही ठिकाणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सेहगल यांनी माध्यम संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आकाशवाणी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेला चालना देण्याचा संदेश सेहगल यांनी यावे...

November 30, 2024 11:42 AM

views 39

प्रयागराज मध्ये होणारा महाकुंभ मेळा हे वैश्विक एकतेचं प्रतिक असल्याचं मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचं प्रतिपादन

प्रयागराज मध्ये होणारा महाकुंभ मेळा हे वैश्विक एकतेचं प्रतिक असल्याचं पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. काल महाकुंभ मेळ्याच्या पूर्वावलोकन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. महाकुंभ म्हणजे संस्कृती, कला आणि हस्तकलेच्या जागतिक देवाणघेवाणीची संधी असल्याचं त्यां...