November 30, 2024 7:36 PM

views 33

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाची सांगता

विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात सुरु केलेल्या आत्मक्लेश उपोषणाची आज सांगता झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. आढाव यांचं आत्मक्लेश उपोषण  सुरू झालं होतं. महाय...

November 30, 2024 7:20 PM

views 45

मुख्यमंत्री भाजपचा, उपमुख्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे – अजित पवार

महायुती सरकारचा शपविधी ५ डिसेंबरला होणार असून मुख्यमंत्री भाजपचा होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील असं पवार म्हणाले. विरोधकांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्याचं खापर मतदान यंत्राव...

November 30, 2024 7:08 PM

views 52

एनसीसीमध्ये मुलींचा सहभाग वाढला पाहिजे – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबईत के सी महाविद्यालयात ‘एनसीसीच्या माध्यमातून कॅडेट मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावरच्या चर्चासत्रचं उद्घाटन झालं. या सत्रात त्यांनी योग आणि ध्यानधारणेचं महत्त्व विशद करत एनसीसी मध्ये मुलींचा सहभाग वाढला पाहिजे अशी आशा व्यक्त केली. यामुळे मुलींचा आत्मविश्व...

November 30, 2024 7:00 PM

views 25

भारत आणि सिंगापूरच्या सैन्याचा तीन दिवसीय संयुक्त सराव संपला

भारत आणि सिंगापूरच्या सैन्याचा देवळाली इथं सुरू असलेला तीन दिवसीय संयुक्त सराव आज संपला. सिंगापूर दारुगोळा विभागाच्या १८२ सैनिकांनी तर भारतीय सैन्यातल्या दारुगोळा रेजिमेंटच्या ११४ सैनिकांनी या सरावात सहभाग घेतला. दोन्ही सैन्यांच्या तोफखान्यांद्वारे संयुक्त शस्त्र नियोजन, अद्ययावत शस्त्रास्त्रांच्या ...

November 30, 2024 8:22 PM

views 37

काँग्रेसच्या मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं प्रतिपादन

महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीची प्रक्रीया पूर्णपणे पारदर्शक होती, तरीही काँग्रेसने याबाबत उपस्थित केलेल्या वाजवी मुद्यांचा विचार केला जाईल असं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या यंत्रणेबाबत शंका उपस्थित करणारं पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहीलं होतं. त्य...

November 30, 2024 8:16 PM

views 37

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन या  भारताचे अव्वल खेळाडूंनी  अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पी.व्ही. सिंधूने  उपान्त्य फेरीत उन्नती हुडा हिला अवघ्या ३५ मिनिटांत २१- १२, २१ - ९ असं हरवलं. अंतिम फेरीत तिची लढत थायलँडच्या लालि नरत चायवान या चीन की लुओ यू वू हि...

November 30, 2024 3:38 PM

views 19

‘ॲग्रीस्टॅक’ संकल्पना राज्यात राबवण्याचा शासनाचा निर्णय

केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या संकल्पनेनुसार, शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. www.mhfr.ॲग्रीस्टॅक.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची प्रक्र...

November 30, 2024 3:33 PM

views 51

अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मुंबईत विले पार्ले इथं काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर, शंकर महादेवन, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि सयाजी शिंदे यांना देखील राज्यपालांच्या हस्ते नटसम्राट बा...

November 30, 2024 3:21 PM

views 32

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल‌ – मंत्री रामदास आठवले

येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल‌, त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचं पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. ते आज उत्तरप्रदेशात लखनौ इथं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. सर्व जाती धर्मियांपर्यंत र...

November 30, 2024 2:44 PM

views 45

मध्य प्रदेशात सांची इथल्या ‘महान स्तूप’ या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर महाबोधी महोत्सव सुरू

मध्य प्रदेशातल्या सांची इथल्या ‘महान स्तूप’ या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर आजपासून दोन दिवसीय महाबोधी महोत्सव सुरू होत आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आज संध्याकाळी जंबुद्वीप पार्क इथं आयोजित या महोत्सवाचं उदघाटन करतील. भगवान बुद्धांचे दोन प्रमुख शिष्य सारीपुत्र आणि मौदगल्यायन यां...