December 4, 2024 9:25 AM

views 31

प्रधानमंत्री मोदी उद्या मुंबईत नवनिर्वाचित सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला राहणार उपस्थित

प्रधानमंत्री मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. नवनिर्वाचित सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. उद्या सायंकाळी आझाद मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीची महायुतीतल्या नेत्यांनी काल पाहणी केली. या सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्र...

December 4, 2024 9:23 AM

views 59

आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या किनवटचा राज्यात चौथा क्रमांक

नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्याने राज्यातून चौथा तर संपूर्ण देशातून ५१ वा क्रमांक पटकावला आहे. “संपूर्णत: अभियानात सहा सूचकांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन काम करण्यात आलं. यात प्रामुख्याने प्रसूतीपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्...

December 4, 2024 9:20 AM

views 43

तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी संस्थापक संचालक बंकटराव कदम यांचं निधन

तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी संस्थापक संचालक बंकटराव कदम यांचं काल जळकोट इथं निधन झालं. कदम यांनी कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे संस्थापक संचालक, जळकोटचे माजी सरपंच, पार्वती कन्या प्रशालेचे अध्यक्ष, महाराष्ट्र वाचनालयाचे अध्यक्ष अशी अनेक पदं भूषवली आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्का...

December 4, 2024 9:17 AM

views 47

जागतिक शौचालय दिनानिमित्त बीड जिल्ह्यात राबवण्यात येणार विशेष मोहीम

जागतिक शौचालय दिनानिमित्ताने बीड जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आमचे शौचालय आमचा सन्मान या मोहिमेत जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी केलं आहे.

December 4, 2024 11:42 AM

views 46

राज्यात उद्या होणार नवनिर्वाचित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा

राज्यात नवनिर्वाचित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी काल महायुतीतल्या नेत्यांनी केली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थ...

December 4, 2024 8:31 AM

views 58

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी; आजही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

राज्यात काल सर्वत्र अंशतः ढगाळ हवामान होतं. सोलापूरसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडल्याची नोंद आहे. आज कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर विदर्भात हवामान कोरडं राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे.

December 3, 2024 8:37 PM

views 32

तेलक्षेत्र नियमन आणि विकास सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

तेलक्षेत्र नियमन आणि विकास सुधारणा विधेयक २०२४ ला आज राज्यसभेत मंजुरी देण्यात आली. या विधेयका अंतर्गत तेलक्षेत्र नियमन आणि सुधरणा विधेयक १९४८ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. सुधारित कायद्यामध्ये खनिज तेलाची व्याप्ती वाढणार आहे.    धोरणात स्थैर्य, विवादांचं सुलभ निराकरण या विधेयकामुळे सोपं होईल...

December 3, 2024 8:32 PM

views 36

जम्मू आणि काश्मीरमध्ये चकमकीत कुख्यात दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथल्या दाचिगाम जंगलात झालेल्या चकमकीत जुनैद अहमद भट हा कुख्यात दहशतवादी ठार झाला. दाचिगाम भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल मध्यरात्री शोध मोहीम राबवली. त्यावेळी सुरक्षा दलांचा सुगावा लागलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय सुरक्षा द...

December 3, 2024 8:26 PM

views 33

राज्यसभेत भारतीय वायुयान विधेयकावर चर्चा

भारतीय वायुयान विधेयक २०२४  वर आज राज्यसभेत चर्चा करण्यात आली. हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलं होतं. या विधेयकामुळे नागरी विमान वाहूतक उद्योगाला आरेखन, उत्पादन आणि देखभाल यासाठी  मदत होणार असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितलं.

December 3, 2024 8:40 PM

views 56

लोकसभेत बँकिंग कायदे सुधारणा विधेयक २०२४ पारीत करण्यासंदर्भात चर्चा

बँकिंग कायदे सुधारणा विधेयक २०२४ पारीत करण्यासंदर्भात लोकसभेत आज चर्चा करण्यात आली. या विधेयकानुसार नॉमिनीजची संख्या चारपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या विधेयकानुसार बँकांना त्यांच्या लेखापरीक्षकांचे मानधन ठरवण्याचा अधिकारही देण्यात येणार आहे.    या सुधारणांमुळे बँक प्रशासनात अधिक बळकटी येणार असू...