December 4, 2024 11:09 AM

views 13

नौदल दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

आज नौदल दिवस आहे. देशाच्या सुरक्षेत नौदलाची भुमिका महत्वाची आहे. नौदलाच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 1971 मध्ये ट्रायडंट अभियानादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत चार पाणबुड्याना समुद्रात बुडवण्यात भारतीय नौदलाला यश आलं होतं या...

December 4, 2024 11:07 AM

views 14

खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ कोणतेही आंदोलन करु नये लोकसभा सचिवालयाने संसद सदस्यांना केली विनंती

सर्व खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ कोणतेही आंदोलन करु नये अशी विनंती लोकसभा सचिवालयानं सर्व संसद सदस्यांना केली आहे. अशा आंदोलनांमुळे अधिवेशनादरम्यान संसद सदस्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. संसद भवनातील सदस्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इमारतीचे प्रवेशद्वार जाण्या-येण्यासाठी मोकळं ठेव...

December 4, 2024 10:55 AM

views 28

भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी नवनियुक्त आमदारांची आज मुंबईत बैठक

भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी नवनियुक्त आमदारांची आज मुंबईत बैठक होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी निरिक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या मुंबईतील आझाद मैदान इथं संध्याकाळी 5 वाजता पार पडेल...

December 4, 2024 10:51 AM

views 21

दक्षिण कोरियातील मार्शल लॉ काही तासांत मागे

दक्षिण कोरियातील नॅशनल असेंब्लीनं मार्शल लॉ संपविण्याच्या बाजूने मतदान केल्यानंतर, तसंच राजकीय क्षेत्रांमधील प्रतिनिधींनी नोंदवलेल्या तीव्र प्रतिक्रियांनंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी मार्शल लॉ उठवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाने मार्शल लॉ जाहीर केल्यानंतर सहा ता...

December 4, 2024 10:44 AM

views 41

क्वांटम तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारताने इस्रायलला भागीदारीसाठी केले आमंत्रित

क्वांटम तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या उद्देशानं भारतातील उद्योगांशी इस्त्रायलमधील स्टार्टअप्सनी भागीदारी करावी यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे. इस्त्रायलचे उद्योग आणि आर्थिक विभागाचे मंत्री नीर बरकत सध्या भारताच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेत...

December 4, 2024 10:34 AM

views 34

बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनकडून व्यक्त

बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटननं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटक भेट देत असलेली ठिकाणं, गर्दीची ठिकाणं, सांस्कृतिक ठिकाणं आणि राजकीय सभांच्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनच्या फॉरेन कॉ...

December 4, 2024 10:18 AM

views 18

पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल

ओमान मधील मस्कत इथे सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने मलेशिया संघाचा 3-1 असा पराभव करत, स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारतातर्फे दिलराज सिंह, रोहित आणि शारदानंद तिवारी यांनी गोल करत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिलं. आज होणाऱ्या अंतिम सामन...

December 4, 2024 9:42 AM

views 54

मुंबईत केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शताब्दी स्तंभाचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते काल मुंबईत केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त शतकमहोत्सवी स्तंभाचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच संस्थेनं विकसित केलेली दोन नवी तंत्रज्ञानं आणि संस्थेच्या कामाशी संबंधित तीन पुस्तकांचं प्रकाशनही या कार्यक्रमात झालं. भारताला जगातली त...

December 4, 2024 9:36 AM

views 51

महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर इथं चैत्यभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत घेतला. महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता र...

December 4, 2024 9:34 AM

views 37

मुंबईची ओळख असलेल्या गेट वे ऑफ इंडियाला आज शंभर वर्षं पूर्ण

मुंबईची ओळख असलेल्या गेट वे ऑफ इंडियाला आज शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. ब्रिटिश सम्राटांच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या गेट वे ऑफ इंडियानं गेल्या 100 वर्षांमध्ये अनेक स्थित्यंतरं पाहिली, अनेक ऐतिहासिक घटनांचा तो साक्षीदार झाला. या वास्तूबद्दल आपल्याला सांगत आहेत मुंबईच्या इतिहासाचे अभ्या...