January 1, 2025 3:54 PM

views 31

‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजनेला प्रारंभ

विद्यार्थ्यांना विद्वत्तायुक्त संशोधन लेख आणि पत्रिका प्रकाशनांमधलं ज्ञान सहज उपलब्ध व्हावं या उद्देशानं आखण्यात आलेल्या 'वन नेशन वन सबस्क्रिप्शन' योजनेला आजपासून प्रारंभ झाला. यामुळे सरकारी अनुदान असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठं आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या देशभरातल्या सुमारे १ कोटी ८० ला...

January 1, 2025 2:30 PM

views 44

मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार ५०हजार रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण देणार

मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार ५०हजार रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण देणार आहे. मुख्यमंत्री उद्योजकता सहाय्य योजनेतून हे कर्ज देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी काल केली. या योजनेअंतर्गत याआधीच ४२६ लोकांना व्यवसायासाठी कर्ज दिल्याचं त...

January 1, 2025 2:27 PM

views 45

येमेनमध्ये हौथी संघटनेच्या ताब्यातल्या लष्करी तळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले

येमेनची राजधानी साना इथं हौथी या लढाऊ गटाच्या लष्करी तळांवर अमेरिकन लष्कराने हवाई हल्ले केले आहेत. हौथीकडून चालवल्या जाणाऱ्या दूरचित्रवाहिनीने ही माहिती दिली. हौथीच्या संरक्षणदलाची इमारत तसंच दारुगोळा उत्पादनांचा कारखाना अशा ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांमुळे लक्षणीय नुकसान झाल्याचं या वृत्तवाहिनीनं म्...

January 1, 2025 2:26 PM

views 53

रशियामध्ये पर्यटन कर लागू

रशियामध्ये आजपासून पर्यटन कर लागू करण्यात आला आहे. अधिकृत रशियन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हॉटेल्स किंवा निवासस्थानांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर आजपासून पर्यटकांना एक टक्का पर्यटन कर द्यावा लागणार आहे. जुलै २०२४ मध्ये रशियन टॅक्स कोड मधल्या सुधारणांनुसार ही करआकारणी सुरु झाली आहे. या सुध...

January 1, 2025 2:20 PM

views 23

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेगाड्या उशीराने धावणार

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत. दिल्लीहून सुटणाऱ्या किंवा तिथे पोचणाऱ्या बावीस गाड्या दोन तासांपर्यंत उशीराने धावत आहेत, अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनाने दिली आहे. प्रवाशांनी स्थानकावर पोहोचण्याआधी आपापल्या रेल्वेगाडीच्या वेळेत बदल झाला असल्...

January 1, 2025 2:19 PM

views 26

पुण्याजवळ कोरेगाव भीमा या ठिकाणी दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घ्यायला हजारोंची गर्दी

पुण्याजवळ कोरेगाव भीमा या ठिकाणी आज दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घ्यायला हजारोजण जमले आहेत. शहर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आज भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन के...

January 1, 2025 3:50 PM

views 20

भरड धान्य खरेदी अंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणीस मुदतवाढ

राज्यात भरड धान्य खरेदी अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत येत्या १५ जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या केंद्रामधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहन अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री धनंजय...

January 1, 2025 3:54 PM

views 56

जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत

देशासह जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या दैदिप्यमान, सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी एकजुटीनं कार्य करण्याच्या वचनबद्धतेला आपण पुन्हा एकदा उ...

January 1, 2025 3:51 PM

views 101

किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन

नांदेड जिल्ह्यातले किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं आज हैदराबाद इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. २००४, २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग तीन वेळा त्यांनी किनवट मतदार संघात विजय मिळवला होता. त्यांच्या पार्थिवावर उद्या किनवट इथल्या दहेली तांड...

January 1, 2025 1:54 PM

views 59

२०२५ हे वर्ष संरक्षण क्षेत्रासाठी सुधारणा वर्ष असेल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची घोषणा

संरक्षण क्षेत्रात सध्या सुरु असलेल्या आणि नव्यानं सुरु केल्या जाणाऱ्या सुधारणांना गती देण्याच्या उद्देशानं २०२५ हे वर्ष सुधारणांचं वर्ष असेल, असं संरक्षण मंत्रालयानं घोषित केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्रालयातल्या सचिवांसोबत बैठक घेऊन विविध महत्व...