January 1, 2025 7:07 PM

views 23

INS शिवाजी नौदलाच्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात ३५ अधिकाऱ्यांचं सागरी अभियांत्रिकी प्राविण्य अभ्यासक्रम पूर्ण

आयएनएस शिवाजी या नौदलाच्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात ३५ अधिकाऱ्यांनी सागरी अभियांत्रिकी प्राविण्य अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. यामध्ये भारतीय नौदलातल्या २१, भारतीय तटरक्षक दलातल्या ४ आणि श्रीलंका, नामिबिया आणि फिलिपाइन्स या देशांमधल्या प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला होता. नौदलातल्या अधिकाऱ्यां...

January 1, 2025 8:39 PM

views 52

शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्रसरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांसंदर्भात त्यांनी  सांगितलं, की देशासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा देशवासियांना अभिमान  आहे. 

January 1, 2025 6:58 PM

views 58

राज्यात विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत

राज्यात विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत झालं. विविध देवस्थानांवर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवसेनेच्या वतीनं ठाण्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत रक्तदान केलं. धुळे जिल्ह्यातही युवक बिरादरी आणि रक्ताशय संस्थेनं गेल्या ४१ वर्षांच्या परंपरेनु...

January 1, 2025 6:56 PM

views 110

डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलन १ लाख ७६ हजार कोटी रुपयांवर

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलन, डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वृद्धी नोंदवून १ लाख  ७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर २०२३  मध्ये एकूण जीएसटी संकलन १ लाख ६४ हजार कोटी इतकं होतं.  डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन ३२ हजार ...

January 1, 2025 8:39 PM

views 51

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताराक्कासह ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत ११ जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात ८ महिला आणि ३ पुरुष आहेत. त्यांच्यावर राज्यात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसं असून, छत्तीसगड सरकारनंही त्यांच्यावर बक्षिस जाहीर केलं होतं.    यात दंडकारण्य झोनल कमिटी प्रमुख आणि भूपती...

January 1, 2025 3:39 PM

views 104

विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्‌मयीन पुरस्कार जाहीर

विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्‌मयीन पुरस्कार आज जाहीर झाले. राज्यस्तरीय आशा सावदेकर स्मृती साहित्य समीक्षा पुरस्कार श्रीनिवास हेमाडे यांच्या ‘तत्वभान` या ग्रंथाला बहाल करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विदर्भ साहित्य संघ अनुवाद पुरस्कार दीपक घारे यांच्या ‘सैय्यद हैदर रक्षा -एका प्रतिभाव...

January 1, 2025 3:31 PM

views 42

महाराष्ट्राचे स्वतंत्र कृत्रिम बुद्धीमत्ता धोरण तयार करण्याचे मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

राज्याचं स्वतंत्र कृत्रिम बुद्धीमत्ता धोरण ठरवण्याच्या दृष्टीने राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली काल एक बैठक झाली. मार्च २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'इंडिया एआय मिशन' अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी १० हजार ३७२ कोटीं रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आ...

January 1, 2025 3:40 PM

views 22

ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद : मॅग्नस कार्लसन आणि यान निपोनमीशी यांना संयुक्तरित्या जाहीर

जागतिक ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांचं विजेते पद मॅग्नस कार्लसन आणि यान निपोनमीशी यांना संयुक्तरित्या जाहीर झालं आहे. न्यूयॉर्कमध्ये काल झालेला अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानं दोघांना संयुक्तरित्या विजेतेपदक देण्यात आलं.    महिलांच्या श्रेणीत चीनच्या जू वेनजून हिनं विजेतेपदक पटकावलं...

January 1, 2025 3:22 PM

views 41

जलजीवन मिशनअंतर्गत विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

खामगाव विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज बुलडाण्यात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. प्रत्येक गावात पाण्याची टाकी बांधण्याकरता तातडीनं जागा उपलब्ध करून द्यावी तसंच खामगाव विधानसभा मतदारसंघातले सर्व प्रकल्प २८ फेब्रुवारी २०२५ प...

January 1, 2025 3:19 PM

views 61

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मार्चमध्ये या परीक्षांना सुरुवात होईल. या परीक्षांना १ लाख ३८ हजार विद्यार्थी बसणार असून त्याकरता ४३९ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे विषय, आसन क्रमांक आणि...