January 9, 2025 3:19 PM

views 59

सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू- शरद पवार

आपला पक्ष सत्तेत जाणार या अफवा असून सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पक्षपदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.   पुढच्या पंधरा दिवसात पक्षात मोठे बदल पाहायला मिळतील,असंही ते म्हणाले. राज्यात...

January 9, 2025 3:17 PM

views 43

ठाण्यात उद्यापासून २१वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव सुरु

मुंबई आणि ठाण्यात उद्यापासून २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव सुरु होत असून त्याचं उद्घाटन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.   या महोत्सवात ६० हुन अधिक देशी विदेशी चित्रपट सादर होणार असून पटकथा लेखक ...

January 9, 2025 3:15 PM

views 43

शिक्षकांनी बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यं रुजवावीत- राज्यपाल

सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षण हे एक महत्त्वाचं साधन आहे. शिक्षकांनी बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यं रुजवावीत, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३३व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. य...

January 9, 2025 3:12 PM

views 71

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बॅडमिंटनपटू एच. एस.प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी त्यांच्या गटांमध्ये उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या ब्रायन यांगवर २१-१२,१७-२१,२१-१५ असा पराभव केला. मालविकानं मलेशियाच्याच गोह जिन वेईचा २१-१५, २१-१६ असा पराभव केला.   मिश्र दुहेरीत ध्रु...

January 9, 2025 1:50 PM

views 71

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक प्रितीश नंदी यांचं काल रात्री निधन

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक प्रितीश नंदी यांचं काल रात्री निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. साहित्यविश्वातल्या योगदानासाठी त्यांना १९७७ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ते राज्यसभेचे खासदारही होते. १९९०च्या दशकात दूरदर्शनवर ‘द प्रितीश नंदी शो’ हा मुलाखतींचा कार्यक्रम ते करत असत.   ‘प्...

January 9, 2025 2:30 PM

views 26

तिरुपतीमधील चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू तर चाळीस जण जखमी

  आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक  व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे, आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हा...

January 9, 2025 2:31 PM

views 43

राष्ट्रपती आजपासून ओडिशा आणि मेघालयाच्या दौऱ्यावर

या परिषदेचा समारोप उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींचं आज भुवनेश्वरमध्ये आगमन होणार आहे. राष्ट्रपती उद्या परिषदेत प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारही प्रदान करणार आहेत. राष्ट्रपती आजपासून ओडिशा आणि मेघालयाच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज मेघालयमध्ये उमियममध्ये आयसीएआ...

January 9, 2025 1:42 PM

views 18

उत्तर भारतात थंडीची लाट आणखी तीव्र

उत्तर भारताच्या बहुतेक सर्व भागात थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे. या ठिकाणी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिमेकडच्या वाऱ्यांमुळे आठवड्याच्या उत्तरार्धात वायव्य भारताच्या काही भागात पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.    हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, पश्च...

January 9, 2025 1:37 PM

views 52

कटरा ते श्रीनगर दरम्यान जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार

  कटरा ते श्रीनगर या दरम्यानचा प्रवास ३ तास १० मिनिटात  करणारी जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे लवकरच सुरु होईल, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.   या रेल्वेला आठ डबे असतील बनिहाल ते कटरा या १११ किलोमीटरच्या टप्प्याची सुरक्षाविषयक अंतिम तपासणी सुरू झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं ...

January 9, 2025 1:33 PM

views 56

भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे-प्रधानमंत्री

  भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज ओदिशामध्ये भुवनेश्वर इथं १८ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उदघाटन करताना बोलत होते. प्रवासी भारतीय दिवस संमेलन, हा केंद्रसरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम, परदेशात स्...