January 9, 2025 7:21 PM

views 55

पुण्यात संविधान सन्मान दौडचं आयोजन

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीनं पुण्यात 'संविधान सन्मान दौड आयोजित केली आहे. स्पर्धकांची नावनोंदणी सुरू झाली असून येत्या २५ तारखेला पहाटे ५ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातून ही स्पर्धा सुरू होईल.

January 9, 2025 7:17 PM

views 89

ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना २०२३ चा मानाचा तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १७ तारखेला दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. साहसी क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक...

January 9, 2025 7:12 PM

views 41

वस्तू आणि सेवा कराचं नवीन प्रारूप येत्या अर्थसंकल्पात लागू करावं – काँग्रेस

छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेवरचा करांचा बोजा कमी करण्यासाठी वस्तू आणि सेवा कराचं नवीन प्रारूप येत्या अर्थसंकल्पात लागू करावं अशी  मागणी काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केली आहे. मुंबईत गांधी भवन इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते.  भाजपा सरकार अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण करत आ...

January 9, 2025 7:06 PM

views 55

वाल्मिक कराडवर ईडीनं कारवाई का केली नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल

बीड जिल्ह्यातल्या सरपंच हत्याप्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवर ईडीनं कारवाई का केली नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होत्या. कराडला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं यापूर्वीच नोटीस दिली होती. मात्र कुठलीही कारवाई झाली नाही. ती झाली असती तर सरपंच हत्याप्...

January 9, 2025 7:02 PM

views 48

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तीन स्तरावर चौकशी सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी, तीन स्तरावर चौकशी सुरू असून, जे कुणी दोषी असतील, त्यांना सोडलं जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात बातमीदारांशी बोलत होते.    या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरचं कुणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर पक्ष न बघता, कारवाई क...

January 9, 2025 6:58 PM

views 54

तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची – मंत्री जयकुमार रावल

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे, असं प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज पुण्यात केलं. ते आज पुण्यात पणन मंडळाच्या वतीनं आयोजित भरडधान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते. भरडधान्य जनजागृतीसाठी काढलेल्या दुचाकी फेरीलाही रावल या...

January 9, 2025 6:53 PM

views 31

२०३०पर्यंत ५०% बिगरजीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध – मंत्री प्रल्हाद जोशी

शाश्वत भविष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून, २०३० सालापर्यंत ५० टक्के बिगर जीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत नवीकरणीय ऊर्जा या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद...

January 9, 2025 8:05 PM

views 58

सरकारनं भारताला ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं – मंत्री नितीन गडकरी

सरकारनं देशाला ऊर्जा आयात करणाऱ्या देशाऐवजी ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्य प्रदेशातल्या पिठमपूर इथल्या राष्ट्रीय वाहन चाचणी केंद्रानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.    भारत आता पारंपारिक ऊर्जेच्या ...

January 9, 2025 3:26 PM

views 52

मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी गडचिरोलीत पत्रकारांचा मूक मोर्चा

छत्तीसगडमधले पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज गडचिरोली इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काही पत्रकारांनी मूक मोर्चा काढला होता. चंद्राकर यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, तसंच पत्रकार संरक्षण समिती स्थापन करावी अशा मागण्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आपल्या निवेदनात...

January 9, 2025 3:22 PM

views 36

वर्सोवा इथं उद्यापासून येत्या १२ जानेवारी पर्यंत ‘वेसावे कोळी सागरी खाद्य महोत्सवाचं’आयोजन

मुंबईत वर्सोवा इथं उद्यापासून येत्या १२ जानेवारी पर्यंत ‘वेसावे कोळी सागरी खाद्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. 'वेसावे कोळीवाड्यात हिंगळा देवी मंदिरात पारंपरिक प्रथेनं पूजेनंतर वेसावे कोळीवाड्यातून वाजत गाजत मिरवणूक निघते.   आणि त्यानंतर ‘वेसावे कोळी सागरी खाद्य महोत्सवाचं उद्घाटन केलं जातं....