January 15, 2025 10:11 AM

views 43

लडाखमध्ये, कारगिलमधील राष्ट्रीय महामार्ग एकवर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

लडाखमध्ये, कारगिलमधील राष्ट्रीय महामार्ग एकवर कटपाकासी शिलिकचे इथं काल एका स्कॉर्पिओची ट्रिपरशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे. जखमींवर कारगिल जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

January 15, 2025 10:08 AM

views 27

भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघादरम्यानचा शेवटचा सामना आज राजकोट इथे खेळला जाणार

भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघादरम्यानच्या, मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज राजकोट इथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने या आधीचे दोन्ही सामने जिंकले असून, आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न असेल.  

January 15, 2025 10:02 AM

views 34

पंजाब, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आज वीजांसह वादळी वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पंजाब, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आज वीजांसह वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टि होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली असून, मध्य भारत आणि महाराष्ट्रातील किमान तापमानात 2 ते 3 अंश स...

January 15, 2025 9:30 AM

views 33

खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ विजयी

खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी काल चमकदार कामगिरी करत विजयाची नोंद केली. प्रियांका इंगळे हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघानं काल सलामीच्या सामन्यात दक्षिण कोरियावर 175-18 असा दणदणीत विजय मिळवला. तर अटी-तटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष संघानंही ब्राझीलवर 64-34 गुणांनी मात क...

January 14, 2025 9:13 PM

views 40

बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूचा विजय

इंडिया ओपन २०२५ बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायनीज तैपेईच्या शुओ यून संग हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.   पुरुष एकेरीत बीडब्ल्यूएफ सुपर ७५९ स्पर्धेत किरन जॉर्जने युशी तनाका याला धूळ चारली.    मिश्र दुहेरीत ध्रुव कपीला आणि तनिषा क्रॅस्टो या जोडीनं य...

January 14, 2025 9:07 PM

views 24

राष्ट्रीय हळद बोर्डाच्या स्थापनेचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

देशातल्या हळद उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसंच हळद उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी केंद्रसरकारने राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं या हळदबोर्डाचं उद्घाटन केलं. तेलंगणात निजामाबाद इथं या बोर्डाचं मुख...

January 14, 2025 9:02 PM

views 10

न्यायाधीशपदी नियुक्त्यांसंदर्भातली शिफारस मंजुरी

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करायला केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे. तर तेलंगण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य ...

January 14, 2025 9:00 PM

views 39

पानिपतच्या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल-मुख्यमंत्री

पानिपतच्या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. ते आज पानिपत युध्दाला २६४ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पानिपत इथं आयोजित मराठा शौर्य दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.    या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्यानं...

January 14, 2025 8:55 PM

views 40

आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी

चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथल्या आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारनं दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे निर्देश दिल्यानंतर ताबडतोब त्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली. कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी १ कोटी ८६ लाख रुपये तर, “आनंद अंध, मुकबधीर” आणि “स...

January 14, 2025 8:52 PM

views 37

राजकीय नेत्यांमधे पूर्वी असलेला सुसंवाद उरला नसल्याची खंत-शरद पवार

राजकीय नेत्यांमधे पूर्वी असलेला सुसंवाद आता उरला नसल्याची खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी इथं शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण करताना थोडीफा...