January 15, 2025 11:13 AM

views 53

संगीत रंगभूमीचे अभ्यासक, गायक, संगीतकार अरविंद पिळगांवकर यांचं निधन

संगीत रंगभूमीचे अभ्यासक, गायक, संगीतकार अरविंद पिळगांवकर यांचं नुकतंच मुंबईत अल्पशा आजाराने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी अनेक नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या. तसंच आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यक्रमांसाठी देखील काम केलं.

January 15, 2025 11:10 AM

views 48

नॉयलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने युवकाचा मृत्यू

नाशिकमध्ये संक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सव साजरा केला जात असतानाच नॉयलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने एका युवकाचा बळी गेला आहे. दरम्यान घातक मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून पोलीस आणि प्रशासनानं राज्यात अनेक ठिकाणी कारवाई करुन नायलॉन मांजाचे साठे जप्त केले आहेत.  

January 15, 2025 11:08 AM

views 24

23व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं बारामतीत आयोजन

23व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं बारामती इथं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून 19 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ऑलिम्पिकपटू दिवंगत खाशाबा जाधव यांचा ...

January 15, 2025 10:58 AM

views 42

छत्रपती संभाजीनगर इथल्या पाणचक्की तसेच दरवाजांचं चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं भागवत कराड यांच्या हस्ते प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर इथल्या ऐतिहासिक पाणचक्की आणि दरवाजांचे चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं काल खासदार भागवत कराड यांच्या हस्ते प्रकाशन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात, पारपत्राची सुविधा शहरातल्या टपाल कार्यालयाद्वारे देण्यात यावी अशी अपेक्षाही कराड यांनी व्यक्त ...

January 15, 2025 10:49 AM

views 15

कुंभ मेळ्यासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे शंभर साधू रवाना

कुंभ मेळ्यासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे शंभर साधू रवाना झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताचे अध्यक्ष संजय बारगजे यांनी दिली. कुंभ मेळ्याबाबत दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते... सगळ्या जातीचे, सगळ्या संप्रदायाचे सर्व लोक एकत्र येऊन एका ठिकाणी स्नान करणं, याच्यासारखी जगात मोठ...

January 15, 2025 10:44 AM

views 180

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निलेश हेलोंडे यांचे निर्देश

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले आहेत. काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.  

January 15, 2025 10:39 AM

views 67

नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात एक लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी ही माहिती दिली. ऑनलाइन नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार असल्याचं त्यांनी ...

January 15, 2025 10:34 AM

views 35

७७व्या लष्कर दिनानिमित्त आज बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या मैदानावर भव्य संचलन सोहळ्याचं आयोजन

पुण्यात साजऱ्या होणाऱ्या ७७व्या लष्कर दिनानिमित्त आज बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या मैदानावर भव्य संचलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी होणाऱ्या गौरवगाथा या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित असतील. या क...

January 15, 2025 10:20 AM

views 44

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी विक्रमी नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यावेळी विक्रमी सव्वा तीन कोटी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. यात परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती शालेय स्तरावर 12 जानेवारीपासून सुरू झाली असून, ती 23 जानेवारी र...

January 15, 2025 10:13 AM

views 47

महाकुंभमेळयात मकरसंक्रांतीच्या दिवशी सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी केलं पवित्र स्नान

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभमेळयात काल मकरसंक्रांतीच्या दिवशी त्रिवेणी संगमावर सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलं. या महाकुंभ मेळयात भाविकांना भाषेचा अडसर होऊ नये म्हणून ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'भाषिणी'मंच उपलब्ध करून दिला आहे. यात अकरा भ...