January 28, 2025 6:59 PM

views 60

CUET-PG : अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशपरीक्षा १३ ते ३१ मार्च दरम्यान होणार

राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे घेतली जाणारी सर्व केंद्रीय आणि सहभागी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशपरीक्षा १३ ते ३१ मार्च दरम्यान होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी आहे.   इच्छुकांना exams.nta.ac/CUET-PG या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

January 28, 2025 6:37 PM

views 45

मुंबईत बीएमसीचा अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेने १७ जानेवारी ते २४ जानेवारी या सात दिवसात फेरीवाल्यांकडून सुमारे २ हजार ७६३ साधनसामुग्री जप्त केली आहे. यात अनधिकृत ५४४ हातगाड्या, ९६८ सिलिंडर व १ हजार २५१ इतर साहित्य यांचा समावेश आहे. फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यां...

January 28, 2025 8:30 PM

views 56

जीबीएस रुग्णांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

जीबीएस, अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमधे विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतला. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्...

January 28, 2025 3:30 PM

views 8

कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेची सुरुवात

कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत 'एक रेशन कार्ड एक साडी' या योजनेची सुरुवात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळमध्ये करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातल्या २४ लाख ८७ हजार ३७५ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार आहे. सहकारी यंत्रमाग संस्था आणि सूक्ष...

January 28, 2025 3:22 PM

views 17

‘अभय’ प्रकल्पाच्या पथदर्शी टप्प्याच्या यशस्वी पूर्ततेबद्दल मंत्री नितिन गडकरींकडून कौतुक

अभय हा प्रकल्प देशभरातले ट्रक चालकांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने सुरू झालेला उपक्रम आहे. ट्रकचालकांना वाहतूक करताना येणारी आव्हानं, त्यांचं शारीरिक तसंच मानसिक आरोग्य यांना प्राधान्य देणारी परिसंस्था तयार करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यात व्यापक स्तरावर आरोग्य तपासणी, डोळ्यांची तपासण...

January 28, 2025 3:47 PM

views 25

SC : हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचारांशी संबंधित कायद्यांचा गैरवापर थांबवण्यासाठीच्या याचिकेला नकार

हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचारांशी संबंधित कायद्यांचं पुनरावलोकन करून त्यांचा गैरवापर थांबवण्यासाठी त्यात सुधारणा करण्याची विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यासाठी समाज सुधारायला हवा, यात आम्ही काहीही करू शकत नाही, असं सांगून न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्...

January 28, 2025 3:47 PM

views 72

राज्यात एसटी भाडेवाढ विरोधात आंदोलन

एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन झालं.  सिंधुदुर्गमधल्या कुडाळ बसस्थानकात आज सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीपूर्वी एसटीची दरवाढ केली नव्हती पण आता निवडणूक झाल्याबरोबर महायुती सरकारने एसटीची  दरवाढ केली.  ही  दरवाढ रद्द झाली ...

January 28, 2025 3:47 PM

views 60

महिलांच्या १९ वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा १५० धावांनी विजय

१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्स गटाच्या अंतिम सामन्यात भारताने स्कॉटलंडवर दीडशे धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत केवळ ५८ धावांवरच गडगडला. स्कॉटलंडची सुरुवात ही चाचपडत झाली. अवघ्या १३ धावांवर पिप्पा केली...

January 28, 2025 2:34 PM

views 22

कांगो देशातला संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची कारवाई

कांगो या देशात सुरू असलेला संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं पुढाकार घेत कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत भारतासह अन्य देश सहभागी घेतल्याबद्दल संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेचे प्रमुख जीन पियरे लॅक्रोइक्स यांनी त्यांचे आभार मानले आहेत.  कांगो गणराज्यात मार्च २३ मूव्हमेंट आणि एम-२३ गटा...

January 28, 2025 3:01 PM

views 55

भारतीय रेल्वेने १३० किमी प्रति तास वेग वाढवण्यासाठी २३,००० किमी मार्गिका केल्या अद्ययावत

भारतीय रेल्वेने २३ हजार किलोमीटरच्या मार्गिका अद्ययावत केल्या असून यामुळे रेल्वे १३० किलोमीटर प्रति तास वेगानं धावण्यासाठी मदत होणार आहे. तसंच ११० किलोमीटर प्रति तास वेगानं रेल्वे धावू शकणाऱ्या ५४ हजार किलोमीटर मार्गिकाही अद्ययावत केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली. यामुळे विविध प्रदेश रेल्वेने...