January 28, 2025 1:43 PM

views 64

महिलांच्या १९ वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे स्कॉटलंडसमोर २०९ धावांचं आव्हान

१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्सच्या फेरीतल्या अंतिम सामन्यात भारतानं स्कॉटलंडसमोर २०९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताची सलामीवीर गोंगदी त्रिशाने नाबाद ११० धावा केल्या. अवघ्या ५९ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने तिनं ही कामगिरी केली. जी कमलीनी हिने अर्धशतक केलं....

January 28, 2025 1:49 PM

views 36

इस्रायली सैन्याची युद्धबंदी कराराअंतर्गत गाझापट्टीतून माघार घ्यायला सुरुवात

इस्रायली सैन्याने युद्धबंदी कराराअंतर्गत गाझापट्टीतून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानंतर हमासने या आठवड्यात तीन इस्रायली ओलिसांना सुपूर्द करायला सहमती दर्शवल्यानंतर काल गाझामधल्या पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करण्यात आली. हमासने दक्षिण इस्रायल भागावर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात ग...

January 28, 2025 1:52 PM

views 13

विकासदर वाढवण्यासाठी देशातल्या संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

केवळ कच्च्या मालाची निर्यात करून विकासाचा वेग वाढणं शक्य नसून विकासदर वाढवण्यासाठी संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. भुवनेश्वर इथे उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा कॉनक्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक सशक्त परिसं...

January 28, 2025 1:48 PM

views 25

१३ भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या नौदलाच्या अटकेत

सागरी सीमा हद्दीचा भंग केल्याप्रकरणी १३ भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलानं अटक केली. हे सर्वजण तामिळनाडूचे आहेत. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन मच्छिमार जखमी झाले असून त्यांच्यावर जाफना इथं रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मच्छीमारांना अटक झाल्यानंतर त्यांच्या गावांमध्ये प्रचंड उद्रेक झाला असून त्य...

January 28, 2025 1:32 PM

views 65

उत्तरप्रदेश : धार्मिक महोत्सवासाठी उभारलेला मंच कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू, ४० जखमी

उत्तर प्रदेशातल्या बागपत इथं आज भगवान आदिनाथ निर्वाण लाडू महोत्सवासाठी उभारलेला मंच कोसळल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले. या महोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात या मंचाची उभारणी केली होती. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविक या मंचावर चढले होते. मात्र, अचानक मंच कोसळला आणि घब...

January 28, 2025 1:53 PM

views 30

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र त्याच्या प्रत्यार्पणाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. २००८च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईवर हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातल्या सहभागामुळे दोषी ठरल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाला विरोध ...

January 28, 2025 12:58 PM

views 38

बांग्लादेशातल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

निवृत्तीनंतरचे विशेष लाभ मिळावेत आणि  अन्य काही मागण्या करत  बांग्लादेशातले रेल्वे कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला. याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, ट्रेन चालक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांत झालेली बैठक निष्फळ ठरली.  देशातील रेल्वे वाहतूक बंद ...

January 28, 2025 12:40 PM

views 48

सर्वंकष आर्थिक भागिदारी कराराच्या चर्चा पुढे नेण्याच्या मुद्द्यावर भारत-ओमानमध्ये चर्चा

व्यापार आणि गुंतवणूक संबंध दृढ करण्यासाठी ओमानसोबत सर्वंकष आर्थिक भागिदारी कराराच्या चर्चा पुढे नेण्याच्या मुद्द्यावर भारत आणि ओमानमध्ये चर्चा झाली. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य मंत्री क्वायस बिन मोहम्मद अल युसुफ यावेळी उपस्थित होते. दोन्ही देशांच्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत या करारा...

January 28, 2025 3:00 PM

views 49

भारत आणि इंडोनेशियाचे नौदल प्रमुख यांच्यात द्वीपक्षीय बैठक

भारत आणि इंडोनेशियाच्या नौदल प्रमुखांमध्ये काल झालेल्या द्वीपक्षीय संवादात उभय देशांदरम्यान सागरी सहकार्य दृढ करणे आणि द्वीपक्षीय संबंध मजबूत कऱण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी आणि इंडोनेशियाचे ऍडमिरल मुहम्मद अली यांच्या दिल्लीत काल सागरी शक्ती सरावाला पुढे नेण...

January 28, 2025 10:20 AM

views 61

भारत-नेपाळ यांच्यात संयुक्त प्रकल्प देखरेख समितीची पाचवी बैठक

भुकंपानंतर पुनर्बांधणी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल भारत-नेपाळ यांच्यादरम्यान स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त प्रकल्प देखरेख समितीची पाचवी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नेपाळमध्ये भारत सरकारच्या सहाय्याने भूकंपोत्तर पुनर्बांधणी प्रकल्पांच्या प्रगतीचा व्यापक आढावा घेण्यात आला. भारतीय...