February 2, 2025 1:47 PM

views 33

बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत डी गुकेश आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आमने सामने

नेदरलँड्स इथे सुरु असलेल्या टाटा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आता विश्वविजेता डोम्मराजू गुकेश आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंद हे दोघे आमने सामने आले असून अंतिम  सामना त्या दोघांमध्ये होईल.    उपांत्य फेरीत काल प्रज्ञानंद ने सर्बियाच्या अलेक्सी सरेना याचा पराभव केला , तर नेदरलँड्स च्या ज...

February 2, 2025 1:34 PM

views 43

गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक कोटी ९५ लाख रुपये

जानेवारी २०२५ या महिन्यात एक कोटी ९५ लाख रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे. जानेवारी २०२४ च्या तुलनेत या महिन्यात कर महसूलात १२ पूर्णांक ३ दशांश टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन ३६ हजार ७७ कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन ४४ हजार ९४२ कोटी रुपय...

February 2, 2025 2:57 PM

views 41

यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तीकरातल्या सवलती प्रमुख वैशिष्ट्य असल्याची उद्योग जगताची प्रतिक्रीया

यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या कर सवलतीं हेच प्रमुख वैशिष्ट्य असल्याची प्रतिक्रीया उद्योग जगताने व्यक्त केली आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करणं हाच यंदाच्या अर्थसंकल्पातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं मत उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी मांडलं आहे. यामुळे मध्यमवर्ग...

February 2, 2025 1:26 PM

views 18

आकाशवाणी भवन इथं ‘हर कंठ में भारत’ हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू

सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन इथं 'हर कंठ में भारत' हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम आजपासून १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज २१ आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी साडेनऊ ते साडेदहा पर्यंत थेट प्रक्षेपित केला जाईल. सांस्कृतिक मंत्रालयाचे स...

February 2, 2025 1:23 PM

views 51

अमेरिकेविरोधात प्रत्युत्तरात्मक शुल्क टॅरिफ लावण्याची कॅनडाची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करांना प्रतिसाद म्हणून, कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी देशात येणाऱ्या १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावायची घोषणा केली आहे. ओटावा इथं वार्ताहर परिषदेत बोलताना, ट्रूडो यांनी मंगळवारपासून ३० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर ...

February 2, 2025 1:15 PM

views 111

ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना जीवन गौरव पुरस्कार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना काल गौरवण्यात आलं. मुंबईत झालेल्या नमन पुरस्कार समारंभात आय सी सी चे अध्यक्ष जय शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पॉली उ...

February 2, 2025 3:49 PM

views 51

U19 World Cup : महिला क्रिकेट स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय

महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालील टी ट्वेंटी  विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय  मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारातनं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. भारताची फलंदाज गोंगदी त्रिशा हिने नाबा...

February 2, 2025 1:07 PM

views 32

संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून मेजर जनरल एयाल जमीर यांची नियुक्ती

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून मेजर जनरल एयाल जमीर यांची नेमणूक केली आहे. ते येत्या ६ मार्चला पदभार स्वीकारतील. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्राएलवर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी पत्करून याआधीचे संरक्षण दल प्रमुख लेफ्टनंट जनरल हेरझी हलेवी यांनी गेल्या महिन्य...

February 2, 2025 3:41 PM

views 44

गुजरातमधे सापुतारा घाटात झालेल्या बस अपघातात 5 जणांचा मृत्यू , 17 जण जखमी

गुजरातच्या डांग जिल्ह्यात सापुतारा घाटात दोनशे फूट दरीत बस कोसळून आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. ही बस भाविकांना घेऊन महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधल्या द्वारका इथं जात होती. सर्व भाविक मध्यप्रदेशातले रहिवासी आहेत. जखमी  प्रवाशांना अहवा इथल्या रुग्...

February 2, 2025 12:22 PM

views 44

मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून काल एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले. त्याचं आंतरराषट्रीय बाजार पेठेतलं मूल्य अंदाजे १६ कोटी ४९ लाख रुपये इतकं आहे. पॅरिसमार्गे मुंबईला आलेल्या प्रवाशाकडून  पांढऱ्या रंगाच्या १७०...