February 3, 2025 10:31 AM

views 44

देशात अवैधरित्या राहून राजकीय प्रक्रिया विस्कळीत करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून सावध राहण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

देशात लाखोंच्या संख्येनं अवैधरित्या राहून राजकीय प्रक्रिया विस्कळीत करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून सावध राहण्याचं आवाहन उपराष्ट्रपतीं जगदीप धनखड यांनी केलं आहे. अवैध प्रवासी नागरिक देशामध्ये राहणं धोकादायक असून, अशा परदेशी घुसखोरांना निवडणुकीच्या राजकारणावर प्रभाव पडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, ...

February 3, 2025 10:27 AM

views 36

खोल समुद्रातल्या संशोधनासाठी अर्थसंकल्पात सहाशे कोटी रुपयांची तरतूद

भारताच्या खोल समुद्रातील महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहाशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे समुद्रात सहा हजार मीटर खोल संशोधन करण्यासाठी, विशेषत्वाने तयार कऱण्यात आलेल्या पाणबुडी पाठवण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. चेन्नईतल्या राष्ट्रीय सागरी उद्योग...

February 3, 2025 9:03 AM

views 46

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

अहिल्यानगर इथं झालेल्या 67व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत, पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यानं मानाची चांदीची गदा पटकावली. गादी गटात पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ हा विजेता ठरला. माती गटात सोलापूरच्या महेंद्...

February 3, 2025 8:50 AM

views 37

आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आदिवासींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वसमावेशक आरोग्य धोरण तयार केल जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केल. आदिवासींच्या आरोग्याच्या समस्या दूर करणं, केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नागपूर इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि...

February 3, 2025 1:18 PM

views 55

वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत आज सादर होणार

लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर होणार आहे. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं पडताळलेल्या पुराव्यांची नोंदही सभागृहासमोर ठेवली जाईल. संयुक्त संसदीय समितीने मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारलं असून काही सदस्यांनी असहमतीच्या नोंदी केल्या आहेत.

February 2, 2025 8:15 PM

views 29

देशभरात वसंत पंचमी उत्साहात साजरी

देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते, तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातील नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो. शिक्षण आणि ज्ञानाचं महत्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असल्याचं र...

February 2, 2025 8:13 PM

views 52

भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया घसरत नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट

भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. ...

February 2, 2025 8:12 PM

views 45

गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख ९५ हजार कोटी रुपयावर

जानेवारी २०२५ या महिन्यात एक लाख ९५ हजार कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे. जानेवारी २०२४ च्या तुलनेत या महिन्यात कर महसूलात १२ पूर्णांक ३ दशांश टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन ३६ हजार ७७ कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन ४४ हजार ९४२ कोटी...

February 2, 2025 8:12 PM

views 50

आदिवासीबहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

आदिवासीबहुल भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागसलेपण दूर करणं सर्वांत मोठं आव्हान असून सरकार त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर मध्ये एम्स इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीनं आय...

February 2, 2025 8:10 PM

views 67

Women’s U19 T20 World Cup: महिला क्रिकेटमध्ये, 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून मात करत भारतानं पटकावलं विजेतपद

महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत, अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवत, विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावात गारद झाला.   भारताच्या गोंगदी त्रिशानं सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर पार...