February 3, 2025 2:49 PM

views 32

भारतीय – अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिला त्रिवेणी या आल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार

भारतीय - अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिनं आपल्या त्रिवेणी आल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. लॉस अँजेलिस मध्ये आज झालेल्या ६७ व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात अकरा नामांकनं मिळवणारी बियॉन्स हिचा काउ बॉय कार्टर हा आल्बम सर्वोत्कृष्ट ठरला. ग्रॅमी मध्ये सर्वात जास्त नामांकनं मिळवणारी कलाकार ...

February 3, 2025 2:20 PM

views 49

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी राजभवनात राज्यपालांची घेतली भेट

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड हे सध्या मुंबई भेटीवर असून त्यांनी काल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि ब्रिटनमधले संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच दोन्ही देशांमधे सहकार्याची भावना वाढीला ल...

February 3, 2025 2:13 PM

views 45

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉलमध्ये पुरुष संघांत सेना दल संघाला तर महिलांच्या संघांत केरळला सुवर्ण पदक

व्हॉलीबॉलमधे पुरुष संघांच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात सेना दल संघाने केरळचा ३-१ असा पराभव करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. सेना दल संघाने पहिले दोन सेट २५-२० आणि २५-२२ असे जिंकले. तिसऱ्या सेटमधे केरळने जोरदार टक्कर देत सेना दल संघाला २५-१९ असं नमवलं. मात्र चौथ्या सेटमध्ये सेना दल संघाने केरळला ...

February 3, 2025 2:10 PM

views 35

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत फूटबॉलमध्ये हरियाणा, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्लीची आपापल्या गटात विजयी सलामी

फूटबॉलमधे हरियाणा, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्लीने आपापल्या गटात विजयी सलामी दिली आहे. गट अ मधे हरियाणाने तामिळनाडूला ७-० अशा मोठ्या फरकाने हरवलं. तर ओदिशाने सिक्कीमवर ५-१ अशी मात केली. गट ब मधे पश्चिम बंगालने यजमना उत्तराखंडला २-० नं हरवत स्पर्धेत आगेकूच केली आहे. या सामन्यात पश्चिम बंगालने सुरुवा...

February 3, 2025 2:07 PM

views 45

मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची अग्रमानांकित सहजा यमलापल्ली हिचा सामना आज थायलंडच्या लानलाना तारारुडी हिच्याशी होणार

मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत भारताची अग्रमानांकित सहजा यमलापल्ली हिचा सामना आज थायलंडच्या लानलाना तारारुडी हिच्याशी होणार आहे. संध्याकाळी साडेचार वाजता हा सामना सुरू होईल. तर उद्या अंकिता रैना हिच्यासमोर देशभगिनी वैष्णवी अडकर हिचं आव्हान असेल. मिश्र दुहेरीत भारताची प्रार्थना ठोंबरे आणि न...

February 3, 2025 1:35 PM

views 52

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार

दिल्ली विधानसभा निवडणूक तसंच उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूतल्या पोटनिवडणुकीसाठी एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सकाळी ७ पासून संध्याकाळी साडेसहापर्यंत हे बंदी आदेश लागू राहतील. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी ४८ तास प्रसारमा...

February 3, 2025 11:39 AM

views 24

क्रिकेटमध्ये 19 वर्षाखालील महिला संघाची विश्वकरंडकाला गवसणी

19 वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी ट्वेंटी विश्वचषकावर, सलग दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. मलेशियातील क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात 9 गडी राखून भारताने, विश्वचषकाला गवसणी घातली. भारतानं 83 धावांचे नाममात्र उद्दिष्ट 12व्या षटकातच पार केलं. गोंगाडी त्रिशाने या...

February 3, 2025 11:28 AM

views 49

पुरुषांच्या 20 षटकांच्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना काल भारतीय संघाने दीडशे धावांनी जिंकला. वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 63 चेंडूत, 97 धावांवर बाद झाला.

February 3, 2025 11:25 AM

views 21

सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

साहित्य संमेलनामधून साहित्याबरोबर, शेती, सहकार, शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर सखोल विवेचन व्हावं, असं मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं काल दहाव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या सहकारमंत्...

February 3, 2025 11:21 AM

views 50

तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. आपण आपल्या भाषेवर ठाम राहीलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संमेलन प्रत्येक शहरामध्ये भरवलं गेलं पाहिजे, ...