February 3, 2025 3:34 PM

views 48

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर चर्चा सुरु

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दु...

February 3, 2025 3:31 PM

views 41

त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक लोकसभेत सादर

त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक २०२५ आज लोकसभेत सादर करण्यात आलं. गुजरातमधे आणंद इथं हे विद्यापीठ स्थापन होणार असून सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथे दिलं जाईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं. लोकसभेत आ...

February 3, 2025 3:27 PM

views 47

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची व्यवहार्यता तपासून पाहावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कृषी क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन असून त्यासाठी व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. पीक आरोग्याचं विश्लेषण, मातीतल्या क...

February 3, 2025 3:23 PM

views 57

१९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून ५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर

सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने ५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने पहिला टी-२० विश्वचषक २०२३मध्ये शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. तर निकी प्रसाद हिच्या नेतृत...

February 3, 2025 3:19 PM

views 57

३७ व्या पक्षिमित्र संमेलनाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे समारोप

३७ व्या पक्षिमित्र संमेलनाचा समारोप काल अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव इथे झाला. पक्षी संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनाचं उल्लेखनीय काम महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना करीत आहे, त्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करून विविध प्रकल्प मार्गी लावावेत, असं मत या संमेलनात व्यक्त झालं. या दोन दिवसीय संमेलना...

February 3, 2025 3:16 PM

views 53

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हळदी-काडगाव मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, ३० जण जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हळदी-काडगाव मार्गावर काल रात्री एका खासगी बसला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले. जखमींना छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही बस गोव्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात...

February 3, 2025 2:44 PM

views 49

महाकुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दु...

February 3, 2025 2:51 PM

views 32

नोएडाच्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमित विमानसेवा एप्रिलमध्ये सुरू होईल – राममोहन नायडू

आशियातलं सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर या नॉयडा इथल्या विमानतळावरून येत्या एप्रिल महिन्यापासून नियमित हवाई वाहतूक सुरु होईल, असं केंद्रीय मंत्री के राममोहन नायडू यांनी आज राज्यसभेत सांगितलं. आपला देश ही हवाई वाहतूक क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं त्यांनी या संदर्भातल्या एका प्रश...

February 3, 2025 2:34 PM

views 29

एन व्ही एस – झीरो टू या उपग्रहाला कक्षा वाढवताना तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला: इस्रो

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एन व्ही एस - झीरो टू या उपग्रहाला नियोजित कक्षेत जाण्यात अपयश आलं आहे. उपग्रहाला नियोजित कक्षेत स्थापित करणाऱ्या थ्रस्टरच्या झडपा वेळेवर उघडल्या नाहीत, असं इसरोतर्फे सांगण्यात आलं. संबंधित तांत्रिक अडथळा दूर करण्याच्या दृष्टीनं पर्यायी व्यवस्थेचा वापर केल...

February 3, 2025 2:26 PM

views 41

अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा कॅनडा आणि मेक्सिकोचा निर्णय

अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा निर्णय कॅनडा आणि मेक्सिको यांनी घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा , मेक्सिको आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे , त्याला प्रत्युत्तर म्हणून या दोन देशांनी हा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेमधून ...