February 5, 2025 1:21 PM

views 29

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ७७ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ७८ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २८ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दल संघाचा समावेश आहे. तसंच, म...

February 5, 2025 11:31 AM

views 11

स्वीडन : ऑरेब्रो गावातील शिक्षण केंद्रात झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू

स्वीडन मध्ये राजधानी स्टॉकहोम जवळ 200 किलोमीटर परिसरातील ऑरेब्रो गावात एका प्रौढ शिक्षण केंद्रात काल झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा ही समावेश आहे स्वीडनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सामूहिक हत्या आहे अस स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी म्हं...

February 5, 2025 11:18 AM

views 36

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनात गेल्या 10 वर्षात भारताची मोठी प्रगती

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनात गेल्या 10 वर्षात भारतानं मोठी प्रगती केली असल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली. समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली. देशात 2014 मध्ये केवळ दोन मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंप...

February 5, 2025 11:16 AM

views 17

सुरक्षा संस्थांच्या प्रयत्नांचं गृहमंत्र्यांकडून कौतुक

जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेसंबंधीची आढावा बैठक काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथ झाली. या बैठकीला गृहसचिव गोविंद मोहन, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत, केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा स...

February 5, 2025 11:11 AM

views 37

राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहणार असून उद्यापर्यंत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.  

February 5, 2025 11:08 AM

views 44

पुण्यात 13 फेब्रुवारीपासून रंगणार तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 अर्थात पिफ-13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते 13 तारखेला होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. 'शो मॅन-राज कपूर' ही...

February 5, 2025 11:03 AM

views 58

टेमघर प्रकल्पाच्या मजबुतीकरणाच्या कामांसाठी 315 कोटी रूपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता

पुणे जिल्ह्यातल्या टेमघर प्रकल्पाची गळती रोखण्यासाठी आणि त्याचं मजबुतीकरण करण्याच्या कामांसाठी 315 कोटी 5 लाख रूपयांच्या खर्चाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. टेमघ...

February 5, 2025 10:56 AM

views 49

लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवड्याचं आयोजन

लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.

February 5, 2025 10:54 AM

views 48

ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

जालना-राजूर रस्त्यावर बावणेपांगरी फाट्याजवळ मध्यरात्री भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

February 5, 2025 10:51 AM

views 68

बीड : ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

बीड जिल्ह्यात काल ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत, तसंच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी सांगितलं.