February 5, 2025 10:48 AM

views 63

राज्य शासनाकडून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य शासनानं काल विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नवी मुंबईतले सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची, नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली असून, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची, छत्रपती संभाजीनगर इथं वस्तू आणि सेवा कर विभागाचे सहायुक्त म्हणून बदली करण्यात आल...

February 5, 2025 10:44 AM

views 82

शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल काल परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी दहा दिवसांच्या आत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतीसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा, असं आवाहन प...

February 5, 2025 10:40 AM

views 54

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्र्यांचं प्रतिपादन

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आबिटकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्हा रुग्णालयातही जिल्हा शल्...

February 5, 2025 10:36 AM

views 40

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालिन कृषीमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची माग...

February 5, 2025 9:30 AM

views 39

प्रधानमंत्री मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला देणार भेट

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथ महकुंभ मेळयात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार असून, सकाळी 11 वाजता ते त्रिवेणी संगमावर पूजा आणि पवित्र स्नान करणार आहेत. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री अनेक साधू संतांची भेट घेणार आहेत. तसच महकुंभमेळा...

February 5, 2025 8:57 AM

views 152

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज बीड दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन, खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ, आष्टी इथल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचं भूमिपूजन, तसंच जागतिक खो-खो स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा सत्कार...

February 4, 2025 8:38 PM

views 40

SC: देशातल्या क्रीडा संस्थांची कार्यपद्धती सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश

देशातल्या क्रीडा संस्थांमधील एकहाती सत्ता संपवून त्यांची कार्यपद्धती  अधिक स्वायत्त, स्वतंत्र आणि न्याय्य व्हावी म्हणून कठोर उपाययोजना करावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांना लिहिलेल्या अपमानकारक पत्राची दखल घे...

February 4, 2025 8:13 PM

views 34

गुजरातमधे समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने ५ सदस्यांची समिती स्थापन

गुजरातमधे समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने तिथल्या सरकारने ५ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या न्यायमूर्ती रंजना देसाई समितीच्या प्रमुख पदी आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज गांधीनगर इथं पत्रकारपरिषदेत सांगितलं की, ही समिती इस्लामसह व...

February 4, 2025 8:09 PM

views 49

आशियाई शेअर बाजारांमधे तेजी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावरचा कर एक महिन्यासाठी पुढे ढकलल्यामुळे आज आशियाई शेअर बाजारांमधे तेजी दिसून आली. त्याचा मोठा परिणाम भारतीय बाजारांमध्ये दिसून आला आणि सेन्सेक्स एकाच दिवसात सुमारे चौदाशे अंकांनी वधारला. गेल्या ४ सत्रात सेन्सेक्सनं ३ हजार २०० अंकांची ते...

February 4, 2025 8:08 PM

views 57

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निवडणूक आयोगान...