February 5, 2025 4:18 PM

views 52

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीतून संगमावर फेरी मारली. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर त्रिवेणी संगमावरचं स्नान ही दैवी अनुभूती...

February 5, 2025 2:35 PM

views 43

टेनिस: सुमित नागलचा रोझारियो चॅलेंजरच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या रोझारियो चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सुमित नागल याचा सामना आज बोलिव्हियाच्या ह्यूगो डेलिएन याच्याशी होणार आहे. सुमितनं याआधीच्या सामन्यात रेंझो ऑलिव्हो याच्याविरुद्ध झालेल्या सामन्यात ५-७, ६-१, ६-० असा विजय मिळवला होता.  

February 5, 2025 2:29 PM

views 56

प्रधानमंत्र्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्याचं केलं आवाहन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदिप धनखड, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर आणि हरदीप सिंह पुरी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, आणि दिल्...

February 5, 2025 2:18 PM

views 40

दिल्ली विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून चोख बंदोबस्त

दिल्ली विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्याविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. राजधानीत बे...

February 5, 2025 2:08 PM

views 37

टेनिसपटू सिमोना हॅलेपची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा

दोन ग्रँडस्लॅम विजेती आणि महिला क्रमवारीत अग्रमानांकित राहिलेली टेनिसपटू सिमोना हॅलेप हिनं व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिचा मायदेश रोमेनियातल्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव झाल्यानंतर तिनं हा निर्णय जाहीर केला. सिमोनानं २०१८मध्ये स्लोन स्टीफन्स हिला हरवून फ्रेंच ओपनचं, तर २०...

February 5, 2025 2:02 PM

views 41

आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं निधन

आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं. ते १०२ वर्षांचे होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची बातमी तमिळ भाषेत आकाशवाणीवरून त्यांनी पहिल्यांदा दिली होती. ही बातमी रेडिओ सिलोनवरून पहाटे पावणे सहा वाजता प्रसारित झाली होती. वेंकटरमण यांनी आकाशवाणीसा...

February 5, 2025 1:57 PM

views 28

दिवंगत लेखक चमन अरोरा यांच्या ‘एक होर अश्वत्थामा’ या पुस्तकाची २०२४ च्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड

दिवंगत लेखक चमन अरोरा यांच्या ‘एक होर अश्वत्थामा’ या डोगरी भाषेतल्या लघुकथांच्या पुस्तकाची २०२४ च्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची घोषणा काल संस्कृती मंत्रालयानं केली. या पुस्तकाची निवड तीन सदस्यांच्या समितीने एकमताने केली आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. ताम्रपट आणि १ लाख रुपये अ...

February 5, 2025 4:13 PM

views 73

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान होत असून दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ३३ पूर्णांक ३१ शतांश टक्के मतदान झालं आहे. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतप...

February 5, 2025 1:29 PM

views 12

गाझा पट्टी ताब्यात घेऊन तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

अमेरिका युद्धग्रस्त गाझा पट्टी ताब्यात घेण्याची आणि तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू आणि ट्रम्प काल व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रदेशातल्या आर्थिक विकासामुळे ...

February 5, 2025 1:26 PM

views 43

देशव्यापी जलसंधारण यात्रेला आजपासून सुरुवात

केंद्रसरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात येत असून त्याचं उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. नवी दिल्लीत काल पत्रकार परिषदेत चौहान यांनी ही माहिती दिली. ‘जल लाये, धनधान्य’ अशी या यात्रेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही यात्रा ६० ते ९० दिवसांत देशभरात...