February 7, 2025 10:59 AM

views 52

पुण्यात जीबीएसचे 173 संशयित रुग्ण

पुण्यात जीबीएसच्या संशयित रुग्णांची संख्या 173 झाली असून, 140 जणांना या आजाराचं निदान झालं आहे. या आजारमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या 72 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून 21 जण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. दरम्यान, दूषित पण्यामुळेच जीबीएस आजार होत असल्याचा अहवा...

February 7, 2025 10:55 AM

views 27

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका – आदिती तटकरे

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. एकात्मिक बाल विकास सेवा पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचं तटकरे यांनी काल सांगितलं.

February 7, 2025 10:50 AM

views 38

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या 11 फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळ सचिव डॉक्टर माधुरी सावरकर यांनी दिली. सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वार...

February 7, 2025 10:45 AM

views 398

सांगलीत आजपासून ‘कृष्णामाई महोत्सवाचं’ आयोजन

सांगलीत आजपासून 'कृष्णामाई महोत्सवाचं' आयोजन करण्यात आलं आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ध्वजारोहण, शोभायात्रा, कृष्णामाई आरती, प्रवचन, भजन, कीर्तन, पथनाट्य, दीपोत्सव, चला जाणूया नदीला, जलपूजन, असे विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त आयर्विन पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून कृष्ण...

February 7, 2025 10:01 AM

views 70

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. अ‍ॅलिस वाझ यांनी काल सांगितलं. निवडणूक आयोग आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या सतत देखरेखीखाली ईव्...

February 7, 2025 9:59 AM

views 43

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या नव्या संरक्षण सचिवांशी दोन्ही देशातील संरक्षण सहकार्याबाबत साधला संवाद

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेचे नवे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी दोन्ही देशातील संरक्षण सहकार्याबाबत संवाद साधला. राजनाथ सिंह यांनी हेगसेथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. अमेरिकेचे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हेगसेथ यांचे त्यांनी अभिनंदन केलं. दोन्ही नेत्...

February 7, 2025 9:57 AM

views 41

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर आणि ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्यात द्विपक्षीय बैठक

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर आणि ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज गेरापेट्रिटिस यांनी काल नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी जयशंकर यांनी भारत-ग्रीस भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. भारताला व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. तर ग...

February 7, 2025 9:54 AM

views 24

सचिन तेंडुलकर यांनं त्यांच्या कुटुंबीयांसह घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनं त्यांच्या कुटुंबीयांसह काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमृत उद्यानात फेरीही मारली. यानंतर झालेल्या एका संवादात्मक सत्रात, सचिन तेंडुलकरनं त्याच्या क्रिकेटपटू होण्याच्या प्रवासातील अनेक किस्से सांगितले. यावेळी विविध ...

February 7, 2025 9:32 AM

views 61

पुणे हे देशाचं संरक्षण उत्पादनाचं केंद्र असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

देशाचं डिफेन्स क्लस्टर अर्थात संरक्षण उत्पादनाचं केंद्र महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यात आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ...

February 7, 2025 9:14 AM

views 37

भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार; रेपोदरात कपातीची अपेक्षा

भारतीय रिझर्व्ह बँक आज आपले द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पतधोरण समितीची पहिली बैठक आहे. या पतधोरणात रेपोदरात किमान पाव टक्क्यानं कपात केली जाईल अशी अपेक्षा आहे. जवळपास पाच वर्षांच्या अंतरानंतर व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आ...