February 7, 2025 8:55 AM

views 47

पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर चार गडी राखून विजय

नागपूर इथं काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने दिलेलं २४९ धावांचं लक्ष्य, भारताने ३९ व्या षटकात सहा गडी गमावत पूर्ण केलं. शुभमन गील ने ८७, श्रेयस अय्यरने ५९ धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामना परवा नऊ तारखेला...

February 6, 2025 8:16 PM

views 26

राष्ट्र प्रथम हेच केंद्र सरकारचं विकासाचं मॉडेल असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार

राष्ट्र प्रथम हे आमच्या सरकारचं विकासाचं मॉडेल आहे. सबका साथ सबका विकास यावर यात भर दिल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राष्ट्रपतींचं भाषण प्रेरक, प्रभावी आणि भविष्याची दिशा देणारं होतं. देशाचा विकसित ...

February 6, 2025 8:14 PM

views 58

बेकायदेशीररित्या परदेशात राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया नवीन नसून सामान्य असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं संसदेत निवेदन

बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया नवीन नसून ही सामान्य प्रक्रिया आहे, आपले नागरिक इतर देशात बेकायदेशीररित्या राहत असतील तर त्यांना परत आणणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यामधे सामान्यपणे स्वीकारलेलं तत्व आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं. अमेरिक...

February 6, 2025 8:13 PM

views 50

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी परीक्षा पे चर्चा मधून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच १० फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत. परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या दृष्टीनं प्रधानमंत्री या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. नवी दिल्लीच्या भारत मंडपम् मधे होणाऱ्या या कार्यक्रमात विविध राज्य आ...

February 6, 2025 7:34 PM

views 56

विदर्भात, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १४ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वत्र हवामान कोरड राहण्या...

February 6, 2025 7:32 PM

views 42

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे होणार दाखल

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. सर्वच शिव पाणंद आणि शेत रस्त्यांची हद्द निश्चित करुन त्यांची काम दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

February 6, 2025 7:29 PM

views 19

स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आणि मुलींचा जन्मदार वाढवण्यासाठी पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार- मंत्री प्रकाश आबिटकर

स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आणि मुलींचा जन्मदार वाढवण्यासाठी येत्या काळात पीसीपीएनडीटी, अर्थात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा अधिक प्रबळ करणार, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत स्त्री आधार केंद्रानं आयोजित केलेल्या ...

February 6, 2025 7:27 PM

views 40

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ८८ पदकं आहेत. त्यात १९ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३३ कास्यपदकांचा समावेश आहे. तीरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात आज महाराष्ट्राच्या शुकमणी बाबरेकर आणि गाथा खडके यां...

February 6, 2025 7:25 PM

views 69

मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार या योजना पुन्हा सुरू केल्या जातील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार या योजना पुन्हा सुरू केल्या जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड इथं झालेल्या सभेत दिली. यासोबतच लाडकी बहीण योजनेसह महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचंही शिंदे म्हणाले. शक्तिपीठ महामार्...

February 6, 2025 7:23 PM

views 38

उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचे निर्देश

उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. पिंपरी चिंचवड इथं पोलीस आयुक्तालय इमारतीच्या पायाभरणी समारंभात ते आज बोलत होते. राज्यातली होऊ पाहणारी जागतिक गुंतवणूक लक्षात घेता उद्योगांसाठी अनुकूल व...