February 7, 2025 2:21 PM

views 52

श्रीलंकन अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या मच्छिमारांना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांकडून निदर्शनं

श्रीलंकन अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या मच्छिमारांना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरून आज विरोधी पक्षांच्या खासदारांनी निदर्शनं केली. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या ९७ मच्छिमारांना अटक केली असून त्यांना परत आणलं पाहिजे, असा मुद्दा द्रमुक खासदार कनिमोळी यांनी लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला....

February 7, 2025 2:17 PM

views 49

आर्थिक नियोजन आणि काटकसरीला प्राधान्य देताना कार्यक्षमतेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष द्यावं – उपराष्ट्रपती

आर्थिक नियोजन आणि काटकसरीला प्राधान्य देताना कार्यक्षमतेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष द्यावं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं आहे. भारतीय संरक्षण दल लेखा सेवेच्या नवनियुक्त अधिकाऱ्यांना काल नवी दिल्ली इथं ते संबोधित करत होते. सरकारी नोकरीत कायद्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सर्वात सुरक्षित...

February 7, 2025 2:12 PM

views 33

अमेरिका – आर्थिक वर्ष २०२६ साठी H-1B व्हिसाची नोंदणी 7 मार्चपासून होणार सुरू

अमेरिकेत आर्थिक वर्ष २०२६ साठी H-1B व्हिसाचा अर्ज ७ मार्च ते २४ मार्चला दरम्यान करता येईल. USCIS, अर्थात अमेरिकन नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवेनं याबाबतचं निवेदन जारी केलं आहे. संभाव्य अर्जदार आणि प्रतिनिधींनी निवड प्रक्रियेसाठी आणि नोंदणी शुल्क भरण्यासाठी USCIS ऑनलाइन खातं वापरणं बंधनकारक असल्याचं या...

February 7, 2025 2:07 PM

views 31

इस्राएलने लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी केले हवाई हल्ले

इस्राएलनं काल रात्री लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. इस्राएलच्या लढाऊ विमानांनी पूर्व लेबनॉनच्या बाल्बेक जिल्ह्यातल्या पर्वत रांगांमध्ये, तसंच दक्षिण लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्याचं लेबनॉनच्या वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. हवाई हल्ल्यांपूर्वी, इस्रायली विमानांनी रश...

February 7, 2025 1:39 PM

views 50

पाकिस्तानातल्या ६८ हिंदू भाविकांचं प्रयागराज इथं कुंभमेळ्यात स्नाान

कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या ६८ हिंदू भाविकांचा जत्था काल प्रयागराज इथं पोहोचला आणि त्यांनी संगमावर पवित्र स्नान केलं. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर या भाविकांनी आपल्या पुर्वजांसाठी धार्मिक विधी आणि प्रार्थना केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना यात्रेकरूंनी कुंभमेळ्...

February 7, 2025 1:36 PM

views 63

चीनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या ५९ खेळाडूंचा सहभाग

चीनमध्ये आजपासून येत्या १४ फेब्रुवारी पर्यंत नवव्या आशियाई हिवाळी क्रीडास्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतल्या भारतीय तुकडीत ८८ जणांचा समावेश आहे. यात ५९ खेळाडू आणि २९ संघ अधिकारी आहेत. यंदा प्रथमच, अल्पाइन स्कीइंग, क्रॉस-कंट्री स्कीइंग, फिगर स्केटिंग, शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग आणि लाँग ट्रॅक स्पीड स्...

February 7, 2025 1:13 PM

views 39

कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. चौपाल हे समर्पित रामभक्त होते, ज्यांनी अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं. समाजाच्या वंचित घटकाच्या कल्याणासाठी केलेल्या काम...

February 7, 2025 11:32 AM

views 60

महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आपली प्रगती करून आत्मनिर्भर व्हावं – प्रताप सरनाईक

धाराशिव इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं. महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या महिलांनी आपली प्रगती करून...

February 7, 2025 11:13 AM

views 49

नांदेड – भोकर शहरात राबवण्यात येणार हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर शहरात दहा ते २३ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने काल भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात झालेल्या डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी कर्मचार्यांच्या प्रशिक्षण सत्रात वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं...

February 7, 2025 11:06 AM

views 40

गोदावरी नदीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जुने कावसान इथल्या गोदावरी नदीत अवैध वाळू उत्खनन करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली. अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या दरम्यान याठिकाणी छापा मारुन हायवा, यारी मशीन, लोडर जप्त केलं.