February 7, 2025 5:23 PM

views 49

वंचित आणि मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कल्याणकारी योजना राबवणार

समाजातल्या वंचित आणि मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे.मात्र या योजनांचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचतो किंवा नाही,याची पाहणी आवश्यक असल्याचं मत राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केलं.वाशिम जिल्ह्यातल्या समाज कल्याण कार्याल...

February 7, 2025 5:17 PM

views 43

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं आहेत. त्यात १९ सुवर्ण,३८ रौप्य आणि ३७ कास्यपदकांचा समावेश आहे.

February 7, 2025 3:54 PM

views 50

रत्नागिरीत क्षेत्रीय वैदिक संमेलनाचं आयोजन

आधुनिक काळातल्या ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन आणि पठणातून काही उपाययोजना करता येते का, यावर संशोधन व्हायला हवं, असं मत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज रत्नागिरीत व्यक्त केलं. तीन दिवसांच्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाह...

February 7, 2025 3:49 PM

views 58

अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना अटक

अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आणि बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना आज पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरात त्यांच्या घरातून अटक केली. ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या या घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून झा...

February 7, 2025 3:42 PM

views 35

लोकसभेत आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे, अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्...

February 7, 2025 3:39 PM

views 57

अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून नवी मुंबईत २०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

NCB, अर्थात अमली पदार्थ विरोधी पथकानं गेल्या आठवड्यात नवी मुंबईत केलेल्या कारवाईत अंदाजे २०० कोटी रुपये किमतीचे विविध प्रतिबंधित पदार्थ जप्त केले. या कारवाईत NCB नं ४ जणांना अटक केली आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अमेरिकेतल्या एका टोळीनं मालवाहू सेवा, आणि मानवी तस्करांच्या माध्यमातून हे पदार्...

February 7, 2025 3:30 PM

views 14.9K

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व ११ खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच, अरविंद सावंत यांची स्पष्टोक्ती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व ११ खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत, कोणीही पक्ष सोडणार नाही असं खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं पत्रकारपरिषदेत बोलत होते. केंद्र आणि राज्यातलं अपयश चर्चेत येऊ नये म्हणून जाणून बुजून अशा अफवांची राळ उडवली जात असल्याचा आरो...

February 7, 2025 3:25 PM

views 55

कोळशाच्या भट्टीवर डांबून ठेवलेल्या २६ वेठबिगार कामगारांची सुटका

कोळशाच्या भट्टीवर डांबून ठेवलेल्या २६ वेठबिगार कामगारांची सुटका पुणे पोलिसांनी केली. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातल्या गिरवी गावात या कामगारांना सहकुटुंब डांबून ठेवून त्यांच्याकडून सक्तीने काम करुन घेतलं जात होतं. याची खबर मिळाल्यावर श्रमजीवी संघटनेनं पोलिसांकडे धाव घेतली. त्यावर कारवाई करत पोलिस...

February 7, 2025 2:27 PM

views 39

युरियाची अनावश्यक टंचाई निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कारवाई करावी – जे. पी. नड्डा

देशात युरिया खतांचा तुटवडा नाही. नफा मिळवण्यासाठी बाजारात युरियाची अनावश्यक टंचाई निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कारवाई करावी, असं आवाहन आज केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत केलं. समाजवादी पार्टीचे खासदार आनंद भदौरिया यांनी उत्तर प्रदेशात युरिया खतांचा तुटवडा असल्याचा ...

February 7, 2025 2:25 PM

views 20

गेल्या वर्षा अखेरीपर्यंत ४ हजार ३०० पेक्षा जास्त कृषी उत्पादक संस्थांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी

गेल्या वर्षा अखेरीपर्यंत ४ हजार ३०० पेक्षा जास्त FPO, म्हणजेच कृषी उत्पादक संस्थांनी ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली असून, या संस्थांमधल्या ४ कोटी ८० लाख शेतकऱ्यांना २४९ कोटी रुपये देण्यात आल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नां...