February 7, 2025 8:19 PM

views 35

गाझा पट्टीतल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्राएलची तयारी सुरु

गाझा पट्टी ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर विधानं केल्यानंतर गाझातल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्राएलनं तयारी सुरु केली आहे. एकदा गाझातून बाहेर पडल्यानंतर इस्राएल पुन्हा परत येऊ देणार नाही अशी भीती वाटत असल्यामुळे पॅलेस्टिनींनी मात्र ट्रंप यांचा प्रस्ता...

February 7, 2025 7:33 PM

views 63

मुंबईत GBS या आजाराचा पहिला रुग्ण आढळला – मुंबई महानगरपालिका

मुंबईत GBS, म्हणजेच गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आल्याचं मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. एका ६४ वर्षीय महिलेला मज्जासंस्थेच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग झाल्याचं यात म्हटलं आहे.

February 7, 2025 7:31 PM

views 40

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे दिवसअखेर १९८ अंकांची घसरण

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर १९८ अंकांची घसरण झाली, आणि तो ७७ हजार ८६० अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४३ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ५६० अंकांवर बंद झाला.

February 7, 2025 7:29 PM

views 20

भारतीय नौदलाचा ‘TROPEX 25’, म्हणजेच ‘कॅपस्टोन थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज’ हा सराव सुरू

हिंदी महासागर क्षेत्रात सध्या भारतीय नौदलाचा ‘TROPEX 25’, म्हणजेच ‘कॅपस्टोन थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज’ हा सराव सुरू आहे. या द्वैवार्षिक सरावात भारतीय नौदलाच्या सर्व ऑपरेशनल युनिट्स बरोबरच भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दलाचा लक्षणीय सहभाग असतो. भारतीय नौदलाचं युद्धकौशल्य प्रदर्शित कर...

February 7, 2025 7:27 PM

views 44

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९९ पदकं आहेत. त्यात २१ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४० कांस्यपदकांचा समावेश आहे. सेना दलांकडे एकूण ६४ पदकं असून त्यापैकी ३८ सुवर्ण पदकं असल्यानं ते पहिल्या स्थाना...

February 7, 2025 7:26 PM

views 21

राज्याच्या कृषी विभागात बॅटरी स्प्रेअर खरेदीत २३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

राज्याच्या कृषी विभागात बॅटरी स्प्रेअर खरेदीत २३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महायुती सरकारमध्ये कृषी विभाग हा भ्रष्टाचाराचं कुरण बनल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळातल्या अधिकारी आणि कृषी विभागाने स...

February 7, 2025 7:24 PM

views 47

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात, गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडनवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ औद्योगिक महोत्सवाचं’ उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत...

February 7, 2025 7:22 PM

views 55

राज्यातल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान वाढलेल्या मतदार संख्येची चौकशी करण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आ...

February 7, 2025 7:19 PM

views 27

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या ५ लाख अपात्र महिलांना वगळलं

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरणाऱ्या ५ लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यात संजय गांधी निराधार योजनेच्या २ लाख ३० हजार महिला, वय वर्षं ६५ पेक्षा जास्त वयाच्या १ लाख १० हजार महिला आणि कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे च...

February 7, 2025 5:28 PM

views 55

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत सामना

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत आज साकेत मायनेणी आणि रामकुमार रामनाथन या जोडीचा सामना तैवानचा रे हो आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू ख्रिस्तोफर रोमियोस या जोडीबरोबर होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. उपान्त्य फेरीतला दुसरा सामना जीवन नेंदुचियान आणि विजय प्रशांत ...