February 8, 2025 7:36 PM

views 26

शेतकऱ्यांना कृषिक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागतील – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा वापर करून शेतीची उत्‍पादन क्षमता वाढवावी लागणार असून शेतकऱ्यांना कृषिक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागतील, असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. डाळिंब उत्‍पादक शेतकऱ्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातल्या राजु...

February 8, 2025 7:35 PM

views 52

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेचा वर्ष २०२५-२६ साठीचा ९४० कोटी रुपयांचा आराखडा सरकारला सादर

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेचा वर्ष २०२५-२६ साठीचा ९४० कोटी रुपयांचा आराखडा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सरकारला सादर करण्यात आला. केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करणं, मधाचं गाव पाटगाव अंतर्गत चांगल्या प्रतीच्या शुद्ध मधाचं उत्पादन वाढवून रोजगार निर्मितीला चालना ...

February 8, 2025 7:17 PM

views 63

दिल्लीतल्या विजयाचा राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं असून त्यांनी भाजपा कार्यालयात जाऊन अभिनंदन केलं. भाजपामधे आनंदाचं वातावरण आहे. दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात कार्यकर्ते फटाके वाजवून आणि मिठाई वाटून विजय साजरा करत आहेत. नागपूरच्या भाजप कार्यालयाबाहेर ढोलताशे वाजवून जल्लोष करण्यात आला...

February 8, 2025 7:15 PM

views 66

३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव हिला सुवर्णपदक

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक १०७ पदकं जिंकली असून त्यात २३ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून ३९ सुवर्ण पदकांसह सेना दलं पहिल्या तर ३० सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. १० हजार...

February 8, 2025 7:14 PM

views 57

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज पहाटे मुंबईत त्यांचं राहत्या घरी निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार तसंच मंत्रालय आण...

February 8, 2025 3:38 PM

views 14

जुन्या आणि निरुपयोगी वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅपिंग अर्थात निष्कासन धोरणाची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. त्यानुसार जुन्या आणि निरुपयोगी वाहनांचं निष्कासन करण्यासाठी राज्यात ६ नोंदणीकृत सुविधा केंद्रांना मान्यता दिली आहे. आपल्या वाहनांचं निष्कासन नोंदणीकृत वाहन सुविधा केंद्रांमार्फत केल्यास नवीन वाहन खरेदी करतांना ...

February 8, 2025 3:38 PM

views 85

MHADA: सदनिका सोडती संदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण

म्हाडा नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नाशिकमधल्या विविध ठिकाणी २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतल्या ४९३ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा काल प्रारंभ झाला. सदनिका सोडती संदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरणही मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते...

February 8, 2025 2:53 PM

views 25

Freestyle Chess Grand Slam: भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश सहाव्या स्थानावर

जर्मनीत बाल्टिक कोस्ट इथं वेसेनहाउस इथं सुरू असलेल्या फ्रीस्टाईल ग्रँडस्लॅम झटपट बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीनंतर भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर  फॅबिअनो कॅरुआना साडेचार गुणांची कमाई करत आघाडीवर आहे. दुसऱ्या स्थानावर जाव्होखिर सिंदारोव असून अजून चार फेऱ्या बाकी आ...

February 8, 2025 2:46 PM

views 35

कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च या विषयावर राष्ट्रीय सर्वेक्षण होणार

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे ‘कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय सर्वेक्षण होणार आहे. या वर्षभरात ही पाहणी होणार असून  निवडक  कुटुंबांनी गेल्या वर्षभरात केलेल्या आरोग्यविषयक खर्चाबाबत माहिती संकलित करण्यात येईल. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश, शासकीय आणि खा...

February 8, 2025 3:43 PM

views 51

प्रधानमंत्री येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या आमंत्रणावरून प्रधानमंत्री १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहेत. पॅरिसमध्ये आयोजित एआय कृती शिखर परिषदेचं सह-अध्यक्ष पद ते भूषवतील. या शिखर परिषदेत कृत्...