July 4, 2025 2:42 PM

views 41

प्रधानमंत्री पाच देशांच्या दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात अर्जेंटिनाला भेट देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात अर्जेंटिनाला जात आहेत. प्रधानमंत्री अर्जेंटिनाच्या राष्ट्रपती जेवियर मिली यांच्या आमंत्रणावर अर्जेंटिनाला भेट देत आहेत. ५७ वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्र्यांची अर्जेंटिनाला ही पहिली भेट आहे. या भेटीत दोन्ही देशांमधल्या सहयोग आणि भागी...

July 4, 2025 2:40 PM

views 44

ईडीने झारखंडमध्ये हजारीबाग आणि रांचीमधल्या आठ ठिकाणांवर टाकले छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने आज झारखंडमध्ये हजारीबाग आणि रांचीमधल्या आठ ठिकाणांवर छापे टाकले. झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपांच्या चौकशीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. खंडणी, बेकायदेशीर वाळू उत्खनन, जमीन हस्तांतरण अशा व...

July 4, 2025 2:35 PM

views 34

29 व्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषदेचं दिल्लीत उद्घाटन

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांच्या हस्ते नवी दिल्लीत २९व्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषद- BES EXPO २०२५चं उद्घाटन करण्यात आलं. गेल्या दहा वर्षात देशातल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली असल्याचं सेहगल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. प्रसार भारतीचे ...

July 4, 2025 2:31 PM

views 35

भारतात खेळ हे कायमच राष्ट्रीय एकात्मतेचं एक सामर्थ्यशाली माध्यम असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

खेळामुळे शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना वाढते, खेळात लोक, विविध प्रदेश आणि देशांना जोडण्याची अद्वितीय शक्ती असते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं ड्युरँड चषक २०२५ या फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचं अनावरण झालं. त्यावेळी राष्ट्रपत...

July 4, 2025 4:52 PM

views 19

राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस पदभरती प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सरकारचे आदेश

राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बोगस पदभरती प्रकरणी, संबंधित विभाग आणि शिक्षणसंस्थांच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करायचे आदेश दिले असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्य मंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाला दिली. आमदार ...

July 4, 2025 2:22 PM

views 11

वाशीम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात ४ जण ठार

वाशीम जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर काल नागपूर कॉरिडॉरवर वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात ४ जण ठार तर १ जण जखमी झाला. या अपघातात तिघंजण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघातग्रस्त वाहन नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथले आहे.

July 4, 2025 12:16 PM

views 33

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेनं स्वदेशी संरक्षण सामग्रीच्या खरेदीसाठी एक लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या दहा प्रस्तावांना मंजुरी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेनं स्वदेशी संरक्षण सामग्रीच्या खरेदीसाठी एक लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या दहा प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये चिलखती वाहनं, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, तिन्ही सेना दलांसाठी एकात्मिक सामायिक इन्व्हेंटरी व्यवस्थापन प्र...

July 4, 2025 12:10 PM

views 56

अमेरिकन काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सादर केलेलं कर आणि खर्च विधेयक केलं मंजूर

अमेरिकन काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सादर केलेलं कर आणि खर्च विधेयक मंजूर केलं आहे. काल रात्री झालेल्या सत्रात प्रतिनिधी सभागृहाने 218 विरुद्ध 214 अशा मतांनी हे विधेयक मंजूर केलं. यामुळे काही प्रमाणात कर कमी होतील, लष्करावरील खर्च वाढेल आणि मेडिकेड, एसएनएपी आणि स्वच्छ ऊर्जा निधीमध...

July 4, 2025 12:06 PM

views 27

लंडनमध्ये सुरु असलेल्या विम्बल्डन टेनीस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजी यानं पुरुष दुहेरी स्पर्धेतल्या दुसऱ्या फेरीत केला प्रवेश

लंडनमध्ये सुरु असलेल्या विम्बल्डन टेनीस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजी यानं पुरुष दुहेरी स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आपला मेक्सिकन जोडीदार मिगएल रायेस-वरेला याच्याबरोबर अमेरिकन जोडीला 6-4, 6-4 असा पराभव केला. पुढच्या फेरीत बालाजी आणि रेयेस-वरेला यांची गाठ चौथ्या मानांकित स्पेनच्या ...

July 4, 2025 9:54 AM

views 42

पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये शानदार स्वागत

भारत हा जगभरातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन इथं काढले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. तत्पुर्वी विमानतळावर त्यांचे शानदार स्वागत करण्यात आलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रव...