July 4, 2025 6:46 PM

views 34

मणिपूरमध्ये 203 बेकायदेशी शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

मणिपूर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत  २०३ बेकायदेशीर शस्त्रं, दारूगोळा, स्फोटकं आणि युद्धसामग्री जप्त केल्याची माहिती मणिपूर पोलीस महासंचालक कार्यालयानं दिली आहे. यासंदर्भात मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे तेनग्नौपाल, कांगपोकपी, चंदेल आणि चुराचंदपूर या मणिपूरच्या क...

July 4, 2025 6:29 PM

views 59

राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या अंमलबजावणीतल्या दुर्लक्षामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे-अंबादास दानवे

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात ३ लाख ३१ हजार अर्ज सरकारकडे पडून आहेत, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नियम २६० अन्वये मांडलेल्या ठरावादरम्यान केला. राज्यातल्या एकूण २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी सौर पंपासाठीचा त्यांचा हिस्सा सु...

July 4, 2025 6:25 PM

views 29

भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं-मुख्यमंत्री

महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगणं हे अजिबात चुकीचं नाही. पण, भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं आहे. अशा प्रकारच्या कृत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.    पहिलीपासून हिंदीसक्तीचा निर्णय हा महाविका...

July 4, 2025 4:48 PM

views 28

उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून २८ कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण केल्याची मंत्री जितनराम मांझी यांची माहिती

गेल्या १० वर्षांत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून २८ कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण केल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग- मंत्री जितनराम मांझी यांनी आज दिली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.    महिला आणि युव...

July 4, 2025 4:15 PM

views 37

नंदुरबार जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत भरोसा सेल तसंच दामिनी पथकांचं  काम उत्तमरित्या सुरू-रूपाली चाकणकर

नंदुरबार जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत भरोसा सेल तसंच दामिनी पथकांचं  काम उत्तमरित्या सुरू असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज नंदुरबार इथं आढावा बैठकीत केलं. या पथकांनी बालविवाह, गर्भलिंगनिदान, हुंडाबळी तसंच  कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाबाबत  कडक कारवा...

July 4, 2025 3:50 PM

views 38

शाळा-महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांना एसटीचे पास थेट त्यांच्या शाळांत वितरित

शाळा- महाविद्यालयांतल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास थेट त्यांच्या शाळांत दिले जात आहेत. १६ ते ३० जून या कालावधीत सुमारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी पास घेतल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. याआधी सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर य...

July 4, 2025 2:56 PM

views 45

अँडरसन-तेंडुलकर चषक स्पर्धेच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत कर्णधार शुभमन गिल याचं ऐतिहासिक द्विशतक

अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी इंग्लंडमध्ये एजबस्टन इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यानं द्विशतक झळकावून इतिहास रचला. इंग्लंडमधील कसोटी सामन्यात द्विशतक करणारा तो पहिला भारतीय तसंच पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. गिलनं केलेल्या दमदार २६९ धावांमुळे भारताला ५८७ एवढी...

July 4, 2025 2:50 PM

views 55

आपली सर्व उद्दिष्ट्ये साध्य होईपर्यंत युक्रेनविरोधातली लष्करी कारवाई सुरूच ठेवणार – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन

आपली सर्व उद्दिष्ट्ये साध्य होईपर्यंत युक्रेनविरोधातली लष्करी कारवाई सुरूच ठेवणार असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काल झालेल्या दूरध्वनीवर चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी ही बाब स्पष्ट केल्याची माहिती रशियाचे परराष्ट्र धोरण...

July 4, 2025 2:48 PM

views 54

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरीत चीनच्या तैपैच्या वांग पो-वेईवर मिळवला विजय

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरीत चीनच्या तैपैच्या वांग पो-वेईवर विजय मिळवला. त्याचा सामना उद्या तैवानच्या तियेन-चेन बरोबर होणार आहे. शंकर सुभ्रमण्यमनं तैवानच्या ह्वांग यु-काईचा पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. महिला एकेरीत श्रियांशी वलिशेट्टी चा सामना...

July 4, 2025 2:47 PM

views 58

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या महिलांच्या टी20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना केनिंग्टनमध्ये होणार

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या महिलांच्या टी20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज केनिंग्टनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामन्याला रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुरुवात होईल. पहिल्या दोन सामन्यात भारतानं विजय मिळवून २-० अशी आघाडी घेतली आहे.