July 4, 2025 8:39 PM

views 38

त्रिनिदादमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांना OCI कार्ड देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत हा जगभरातला तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब असल्याचं गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन इथं काढले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. तत्पूर्वी विमानतळावर त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधल्या भारतीय समुदाया...

July 4, 2025 7:56 PM

views 38

सर्वोच्च न्यायालयाचा एनईईटी यूजीच्या अंतिम निकालांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार

सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (एनईईटी यूजी)२०२५ च्या अंतिम निकालांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. एका प्रश्नासाठी अनेक योग्य उत्तरे असू शकतात, राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेच्या अंतिम उत्तरांत या टप्प्यावर हस्तक्षेप करता येणार न...

July 4, 2025 8:42 PM

views 50

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं केलं अनावरण.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोह...

July 4, 2025 7:53 PM

views 21

इएलआयद्वारे नवीन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणं हा या योजनेचा उद्देश

केंद्र सरकारनं एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (इएलआय) या योजनेला मंजुरी दिली आहे. नवीन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणं आणि सामाजिक सुरक्षा वाढवणं हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या लाभासाठी कामगार आणि आस्थापनांची इपीएफओकडे नोंदणी असणं आवश्यक आहे. १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ दरम्यान निर्माण झ...

July 4, 2025 7:52 PM

views 56

वस्तू आणि सेवा कर उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक संपन्न

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह ९ राज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तर २ राज्यांचे प्रतिनिधी आभासी पद्धत...

July 4, 2025 8:42 PM

views 32

उद्धव आणि राज ठाकरे पक्षाचा संयुक्तपणे विजयी मेळावा

राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या संयुक्तपणे विजयी मेळावा घेणार आहेत. दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत समाज माध्यमावर याविषयी माहिती दिली होती. मुंबईत वरळी इथं आयेजित या विजयी मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठा...

July 4, 2025 7:12 PM

views 22

कोल्हापुरी चपलेच्या रचनेचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल प्राडा संस्थेविरुद्ध कारवाईची मागणी

प्रसिद्ध कोल्हापुरी चपलेच्या रचनेचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल प्राडा या जागतिक फॅशन संस्थेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. २२ जून रोजी इटलीत मिलान इथे झालेल्या फॅशन शोदरम्यान प्राडाने सादर केलेल्या चपलांच्या रचनेचं कोल्हापुरी चपलांशी साम...

July 4, 2025 7:06 PM

views 22

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणीत कोठडीत असताना मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई विजयाताई सूर्यवंशी यांनी याबद्दलची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली...

July 4, 2025 6:58 PM

views 37

केंद्र सरकार २०२६ च्या हज यात्रेसाठीची अर्ज प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू करणार

केंद्र सरकार २०२६च्या हज यात्रेसाठीची अर्ज प्रक्रिया येत्या आठवडाभराच्या आत सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. रिजिजू यांनी आज नवी दिल्ली इथं हज यात्रेविषयी आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.  सर्व अर्जदारांना वेळेत अर्ज भरा...

July 4, 2025 6:52 PM

views 50

आजच्या बहुआयामी प्रशासनाच्या युगात इतरांपासून अलिप्तपणे काम करणं हिताचं नाही-जितेंद्र सिंह

आजच्या बहुआयामी प्रशासनाच्या युगात इतरांपासून अलिप्तपणे काम करणं हिताचं नाही असं मत केंद्रिय कार्मिक, लोक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सशस्त्र दल आणि नागरी सेवांमधल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. सिंदू...