July 5, 2025 8:12 PM

views 35

अँडरसन – तेंडूलकर कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे ४०० हून अधिक धावांची आघाडी, शुभमन गिल शतकाच्या उंबरठ्यावर

अँडरसन - तेंडुलकर चषक क्रिकेट स्पर्धेतल्या, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ४ गडी बाद ३०४ धावा झाल्या आहेत. त्यामुळं भारताकडे एकूण ४८४ धावांची आघाडी झाली आहे. पहिल्या डावात द्विशतक ठोकणारा कर्णधार शुभमन गिल यानं या डावात नाबाद शतक ठोकलं. केएल राहुल आणि ...

July 5, 2025 7:34 PM

views 54

आषाढी एकादशीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपुरात दाखल, आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शनाचंही आयोजन

आषाढी एकादशी सोहळा उद्या साजरा होणार आहे. यानिमित्तानं उद्या पहाटे विठ्ठल रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. या सोहळ्यासाठी हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरी इथं अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर दाखल झाल्या आहेत. भा...

July 5, 2025 7:30 PM

views 57

विजयी मेळाव्यात मराठी ऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजयी मेळाव्यात मराठी ऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्ता असताना ते काहीही करू शकले नाही. तरी त्यांना पुन्हा सत्ता हवी असल्याचं फडणवीस म्हणाले. दोन्ही भावांना एकत्र आणल्याच्या मुद्द्यावरही त्...

July 5, 2025 7:29 PM

views 95

भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाचं काम पुढील चार महिन्यात सुरू होईल – मंत्री नितिन गडकरी

भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाचं काम पुढील चार महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज भंडारा इथं केली. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील भंडारा बायपास तसंच मौदा वाय जंक्शन इथल्या सहा पदरी उड्डाणपुलाचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावे...

July 5, 2025 7:22 PM

views 59

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक डोणगावकर यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक डोणगावकर यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. १९९५ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येत त्यांनी राज्यात युती सरकार स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करता...

July 5, 2025 5:22 PM

views 48

आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपुरात दाखल

आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपुरात दाखल होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी इथं मुक्कामी असून संत तुकाराम महाराज, सोपान काका महाराज, संत मुक्ताई, संत गजानन महाराज यांच्या पालख्या पंढरपूर जवळ पोहोचल्या आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी पं...

July 5, 2025 4:07 PM

views 76

विंम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे सामने होणार

विंम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत. पुरुष दुहेरीत आज युकी भांब्री आणि अमेरिकेचा रॉबर्ट गैलोवे यांच्या जोडीचा सामना पोर्तुगालच्या नूनो बोर्गेस आणि अमेरिकेच्या मार्कोस गिरोन या जोडीशी होणार आहे. तर भारताच्या एन.श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोच्या मिगुएल एंजल रेयेस-वरेला या जोडी...

July 5, 2025 3:33 PM

views 64

भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध ‘बहुडा यात्रा’ सुरु

ओदिशामध्ये, पुरी इथं आज भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध 'बहुडा यात्रा' सुरु आहे. आपलं जन्मस्थान असलेल्या गुंडीचा मंदिरात एक आठवडा मुक्काम केल्यावर या देवता आपल्या रथातून १२ व्या शतकातल्या श्री जगन्नाथ मंदिरामध्ये परततील.  विविध धार्मिक विधी संपन्न झाल्यावर दुपारी या  दे...

July 5, 2025 3:32 PM

views 21

Anderson-Tendulkar Trophy Cricket Test: दुसऱ्या सामन्यात भारत २४४ धावांनी आघाडीवर

बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर करंडक स्पर्धेत दुसऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या दिवशी आज भारत आपला दुसरा डाव खेळणार आहे.    इंग्लंडनं पहिल्या डावात ४०७ धावा केल्या. यात मोहम्मद सिराजनं सहा आणि आकाश दीपने चार बळी घेतले. इंग्लंडच्या जेमी स्मिथने नाबाद १८४ धावा तर हॅरी ब्रूकने १...

July 5, 2025 3:23 PM

views 27

US: कर सवलत, सरकारी खर्चात कपात करण्याशी संबंधित ‘वन बिग ब्युटीफुल लाॅ’ विधेयकावर स्वाक्षरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर सवलत आणि सरकारी खर्चात कपात करण्याशी संबंधित 'वन बिग ब्युटीफुल लाॅ' विधेयकावर काल स्वाक्षरी केली. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर  व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. रिपब्लिकन-नियंत्रित प्रत...