July 6, 2025 1:19 PM

views 44

अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान ४९ जणांचा मृत्यू

अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान ४९ लोकांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये १५ लहान मुलांचा समावेश असून, एका खाजगी युवा शिबिरातून २७ मुलं बेपत्ता असल्याची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आह...

July 6, 2025 1:23 PM

views 51

विम्बल्डनमध्ये अरीना साबालेंका आणि कार्लोस अल्काराज यांचे सामने

विम्बल्डनमध्ये आज महिला एकेरीत अग्रमानांकित अरीना साबालेंका हिचा सामना एलीजे मर्टन्स हिच्याविरुद्ध रंगणार आहे. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला, गतविजेता कार्लोस अल्काराज याच्यासमोर आंद्रे रुब्लेव्ह याचं आव्हान असेल. तर पाचव्या क्रमांकावर असलेला टेलर फ्रिट्झ, जॉर्डन थॉम्पसन या...

July 6, 2025 1:13 PM

views 115

एलॉन मस्क यांची अमेरिका पार्टी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा

अमेरिकन उद्योगजक एलॉन मस्क यांनी काल ‘एक्स’वर ‘अमेरिका पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. रिपब्लिकन्स आणि डेमॉक्रॅट्स या दोन पक्षांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा यामागचा उद्देश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्यानंतर काही दिवसांतच मस्क यांनी ही घोषणा केली. एलॉन मस्...

July 6, 2025 1:10 PM

views 38

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांशी बैठक संपन्न

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल रिओ दी जानेरो इथं ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांशी बैठका घेऊन धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रातला सहयोग वाढवण्यासह द्विपक्षीय सहकार्याच्या इतर मुद्द्यावर चर्चा केली. ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीच्या...

July 6, 2025 1:07 PM

views 15

अशूरा-ए-मुहर्रम देशाच्या विविध भागात पाळला जात आहे

अशूरा-ए-मुहर्रम आज देशाच्या विविध भागात पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्य आणि न्यायासाठी करबाला इथं दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने या बलिदानाचं स्मरण करून, यातून लोकांना बिकट परिस...

July 6, 2025 12:48 PM

views 36

अर्जेंटिनाच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री ब्राझीलमध्ये पोहोचले, १७व्या ब्रीक्स परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा संपवून आज ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो इथं पोहोचले. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी अर्जेंटिलाना भेट द्यायची ५७ वर्षांतली ही पहिली वेळ आहे. या भेटीची सुरुवात मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपिता आणि स्वातंत्र्यसैनिक जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांच्या स्...

July 5, 2025 8:18 PM

views 54

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिना दौऱ्यावर, अर्जेंटिनाच्या अध्यक्षांसोबत विविध सामंजस्य करारांची शक्यता

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्युनोस आयर्स इथं अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हॅविअर मिले यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यात व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य आणि औषधनिर्माण, संरक्षण आणि सुरक्षा, खाणकाम आणि खनिज संपत्ती यासारख्या मुद्द्यांवर सहकार्य कराराची अपेक्षा आहे...

July 5, 2025 8:15 PM

views 47

मराठीच्या मुद्द्यावर एकजूट कायम राखण्याचं राज आणि उद्धव ठाकरे यांचं आवाहन

मराठीच्या मुद्द्यावर राज्यातल्या सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद दूर करुन एकत्र यावं असं आवाहन राज आणि उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुंबईत वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या भाषणानं या मेळाव्याला सुरुवात झाली. राज्यातल्या जनतेला आधी भाषेवरून आणि नंतर जातीपातींमध्ये विभागण्याचा...

July 5, 2025 8:14 PM

views 36

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचं भूमीपूजन

केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरात मध्ये त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातल्या पहिल्या सहकार विद्यापीठाची कोनशिला बसवण्यात आली. कोट्यवधी गरीब आणि ग्रामीण लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी आपलं मंत्रालय वचनबद्ध आहे, देशातल्या सहकार चळवळीत आता सुमारे ४० लाख कामगार जोडल...

July 5, 2025 8:14 PM

views 60

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात मराठी ऐवजी सत्तेची लालसा दिसून आल्याची भाजपा आणि शिवसेनेची टीका

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात मराठी भाषेच्या आडून द्वेष आणि आगपाखड दिसून आल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही महायुती सरकारनेच मिळवून दिल्याची आठवणही शिंदे यांनी यावेळी करून दिली.