July 6, 2025 7:35 PM

views 39

येत्या दोन दिवसांत कोकण, विदर्भ, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहायची शक्यताही व्यक्त केली आहे.

July 6, 2025 7:31 PM

views 49

पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल-मंत्री नितीन गडकरी

पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल, असं प्रतिपादन विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ऊसशेतीसाठी कृत्रिम तंत्रज्ञान या विषयावर नागपूर इथे एग्रोव्हीजन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या विशेष कार्यशाळेत...

July 6, 2025 7:30 PM

views 19

आपण ज्ञानेश्वर, शिवराय, सावित्रीमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारश्याचे वाहक असल्याचं मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन

आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वंशज नसलो, तरी विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी आजपासून ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. त्यात ते बोलत होते. या सर...

July 6, 2025 7:28 PM

views 47

नाशिक इथं आयोजित ७ व्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळनं पटकावलं सुवर्ण पदक

नाशिक इथं आयोजित ७ व्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळ यानं आज सुवर्णपदक पटकावलं. अंतिम लढतीत त्यानं तामिळनाडूच्या ए. एस. जोसेफ याचा ११-८ असा पराभव केला. याच प्रकारात महाराष्ट्रच्याच अरोह जाधव आणि पंजाबच्या हेयांश गर्ग यांना संयुक्तपणे कांस्य पदक मिळ...

July 6, 2025 7:26 PM

views 42

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती देण्याचं विठ्ठलचरणी साकडं

पांडुरंगाने राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा, असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विठ्ठलाला घातलं. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे मानाच्या वारकरी दांपत्यासह फडनवीस यांनी सपत्निक, विठ्ठ...

July 6, 2025 2:34 PM

views 24

आज जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन

आज जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार भारतात प्राणी चावल्याच्या जवळपास ९१ लाख घटना दरवर्षी घडतात आणि कुत्रा चावल्यानं रेबीज होऊन पाच हजार सातशेपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडतात. २०३० पर्यंत कुत्र्यामुळे होणाऱ्या रेबीजचं निर्मूलन करण्यासाठी आरोग्य यंत्...

July 6, 2025 1:39 PM

views 17

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं हिमाचल प्रदेशात धरमशाला, कांग्रा इथं उत्सव सुरूआहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिबेटचे अध्यात्मिक गुरु परमपूज्य दलाई लामा यांना त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. परमपूज्य दलाई लामा हे प्रेम, करुणा, संयम आणि नै...

July 6, 2025 1:29 PM

views 45

उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा, गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

दिल्लीतील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे तीव्र उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशसाठी ८ जुलैपर्यंत हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान सुरूच आहे. आज सकाळपासून राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडत आहे....

July 6, 2025 1:27 PM

views 25

नीरज चोप्रानं क्लासिक २०२५ अ‍ॅथलेटिक्स सुवर्ण-स्तरीय स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं बंगळुरू इथं झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक २०२५ या जागतिक अ‍ॅथलेटिक्स सुवर्ण-स्तरीय स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं. त्यानं ८६ पूर्णांक १८ शतांश मीटर लांब भाला फेकत हा किताब जिंकला. केनियाचा ज्युलियस येगो यानं ८४ पूर्णांक ५१ शतांश मीटरसह दुसरा, तर श्र...

July 6, 2025 1:23 PM

views 37

अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची पाचवी तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी ७ हजार २०८ यात्रेकरूंची पाचवी तुकडी ३०७ वाहनांच्या ताफ्यात जम्मूतल्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प इथून आज सकाळी काश्मीर खोऱ्यासाठी रवाना झाली.  यात ५ हजार २५८ पुरुष, १ हजार ५८७ महिला, ३० मुलं, २७७ साधू आणि ५६ साध्वींचा समावेश होता. यापैकी ३ हजार १९९ यात्रेकरू बालताल बेस कॅम्पल...