July 7, 2025 2:24 PM

views 39

अमरनाथ यात्रेसाठी सहावी तुकडी रवाना

श्री अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतील भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प इथून आज सकाळी ८ हजार ६५० भाविकांची सहावी तुकडी रवाना झाली. यापैकी ३ हजार ४८६ भाविक बालटाल मार्गाने आणि ५ हजार ११९ भाविक पहलगाम मार्गाने पवित्र गुहेत जातील. यंदा या यात्रेदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

July 7, 2025 2:22 PM

views 37

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

कारगिल युद्धावेळी अतुलनीय शौर्य दाखवत सर्वोच्च बलिदान देणारे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॅप्टन बत्रा यांना समाज माध्यमावर आदरांजली वाहिली आहे. कारगिल युद्धा दरम्यान कॅप्टन बत्रा यांनी दाखवलेलं शौर्य आणि बलिदान हे दे...

July 7, 2025 1:23 PM

views 42

भारताकडे पुढच्या वर्षी ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद

ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद पुढच्या वर्षी भारताकडे असणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा यंदाच्या परिषदेतला सहभाग आणि ब्राझिल दौरा महत्त्वाचा असल्याचं केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव दामू रवी यांनी सांगितलं. ब्राझमल मधे रिओ द जानिरो इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जागतिक...

July 7, 2025 2:17 PM

views 13

सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्याप्रती ब्रिक्स नेत्यांची वचनबद्धता

ब्राझीलमध्ये रिओ द जेनेरिओ इथं सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत, ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवली. यावेळी सर्व राष्ट्रांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या परिषदेत शांतता आणि सुरक्षितता यावरील सत्राच्या सुरवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मो...

July 6, 2025 8:22 PM

views 45

आषाढी एकादशीनिमीत्त महाराष्ट्रात सर्वत्र भक्तिमय वातावरण

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांचा महासागर लोटला आहे. सर्वत्र जय हरी विठ्ठल आणि पांडुरंग हरीचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेल्याचं वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या. विठूमाऊली आपल्या समाज...

July 6, 2025 8:21 PM

views 34

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रिओ दी जानेरोमधे दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री आज ब्राझीलला पोहोचले. तिथल्या भारतीय समुदायानं उत्साहात त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो इथल्या म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट इथं पोचले, तेव्हा ...

July 6, 2025 8:19 PM

views 34

अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान ४९ जणांचा मृत्यू

अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान ४९ जणांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये १५ लहान मुलांचा समावेश असून, एका खासगी युवा शिबिरातून २७ मुलं बेपत्ता असल्याची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे...

July 6, 2025 8:18 PM

views 22

जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या साक्षी चौधरीनं महिलांच्या ५४ किलो गटात पटकावलं सुवर्ण पदक

कजाकीस्तानमधे अस्ताना इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या साक्षा चौधरीनं आज महिलांच्या ५४ किलो गटात सुवर्णपदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या योसेलीन पेरेसवर ५-० असा निर्विवाद विजय नोंदवला.

July 6, 2025 8:15 PM

views 59

देशाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांचं योगदान महत्त्वपूर्ण – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

देशाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाला चार वर्ष झाल्याबद्दल गुजरातमध्ये आणंद इथं अमूल आणि ‘एनडीडीबी’ अर्थात, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करताना शाह बोलत होते. दोन लाख नवी...

July 6, 2025 8:16 PM

views 31

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय दृष्टिपथात

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यावर भारताची मजबूत पकड कायम. आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी, पावसामुळे खेळ उशीरा सुरू झाला. मात्र भारताच्या आकाशदीप यानं ओली पोप आणि हॅरी ब्रुक यांना झटपट माघारी धाडलं. त्यानंतर वॉशिंगटन सुंदर यानं उपहाराआध...