July 8, 2025 8:09 PM

views 41

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्राझिल दौऱ्यावर, विविध क्षेत्रात सामंजस्य करार होणार

ब्राझिलच्या दौऱ्यावर असलेले प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचं आज ब्राझिलिया शहरातल्या आल्वोराडा पॅलेसमध्ये राष्ट्राध्यक्ष लुइझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी औपचारिक स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी आज ब्राझीलच्या अध्यक्षांसमवेत व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासारख्या परस्पर ह...

July 8, 2025 7:58 PM

views 32

स्पेनमध्ये माद्रिद इथं आजपासून तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा सुरु

स्पेनमध्ये माद्रिद इथे आज रात्री सुरू होणाऱ्या तिरंदाजी विश्वचषकाच्या चौथ्या टप्प्यात दीपिका कुमारी आणि ज्योती सुरेखा वेन्नम भारताचं नेतृत्व करतील. या स्पर्धेत ४९ देशांमधले ३३६ तीरंदाज सहभागी होणार असून ही स्पर्धा १३ जुलै पर्यंत सुरू असेल. या दोघींसह तरुणदीप राय, प्रणीत कौर, प्रीतिका प्रदीप हेही सहभ...

July 8, 2025 7:52 PM

views 93

WAVE: कला सेतू या रियल टाईम लँग्वेज टेक फॉर इंडिया चॅलेंजला सुरुवात

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कला सेतू या रियल टाईम लँग्वेज टेक फॉर इंडिया चॅलेंजला सुरुवात केली. भारतातल्या आघाडीच्या एआय स्टार्टअप्सना अनेक भारतीय भाषांमधला मजकूर दृकश्राव्य अथवा ग्राफिकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी अॅप्लिकेशन विकसित करण्याचं आव्हान या उपक्रमात ठेवण्यात आलं आहे. लेखी साह...

July 8, 2025 6:51 PM

views 42

पंढरपुरात एकादशी दिवशी २७ लाखापेक्षा जास्त वारकरी दाखल

यंदा आषाढीवारीतल्या गर्दीनं उच्चांक गाठला असून, पंढरपुरात एकादशी दिवशी २७ लाखापेक्षा जास्त वारकरी दाखल झाल्याचा दावा प्रशासनानं केला आहे. यंदा ड्रोनच्या माध्यमातून एआय प्रणालीव्दारे जमलेल्या गर्दी विश्लेषण करण्यात आलं. त्यात ही माहिती समोर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

July 8, 2025 6:45 PM

views 37

टेक्सासमध्ये पूरबळींची संख्या १०४ वर, ४१ जण बेपत्ता

टेक्सासमध्ये पूरबळींची संख्या १०४ वर पोहचली आहे, ४१ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू असून ही आकडेवारी सातत्यानं बदलती आहे. केर कौंटी इथं सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. इथं नदी किनारी असलेल्या ख्रिश्चन गर्ल्स कॅम्पमधल्या अनेक बालकांचा मृत्यू झाला असून तर अनेक बेपत्ता आहेत.

July 8, 2025 6:43 PM

views 41

आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतल्या अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा- राज्यपाल

अनुसूचित जातीतल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी गुणवत्तेवर प्रवेश आणि नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा, आणि आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतल्या अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज मुंबईत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसाय...

July 8, 2025 6:43 PM

views 46

घटना दुरुस्तीकरून राज्य घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही-सरन्यायाधीश

भारतीय राज्यघटनेतली मूलभूत तत्वं आणि मूलभूत अधिकार हे घटनेचा आत्मा आहेत, या दोन्हींचा एकत्र विचार करून सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी काम केलं पाहिजे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उपस्थितांना संबोधित करत होते. कुठल्याही पदासोबत ज...

July 8, 2025 3:25 PM

views 42

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या, पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीतला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू कार्लोस अल्काराझ याचा सामना ब्रिटनच्या कॅमरन नोरी बरोबर होईल तर जागतिक क्रमवारीतला पाचव्या क्रमांकाचा खेळाडू टेलर फ्रिट्ज चा सामना खा...

July 8, 2025 3:18 PM

views 60

वाहतूक क्षेत्राने पर्यावरणाच्या बाबतीत सर्वाधिक जबाबदारी निभावली – मंत्री नितीन गडकरी

वाहतूक क्षेत्रामुळे देशातल्या प्रदुषणात चाळीस टक्के भर पडते. त्यामुळे या क्षेत्राने पर्यावरणाच्या बाबतीत सर्वाधिक जबाबदारी निभावली पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. फरिदाबाद नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कॉरिडॉरवर एक पेड माँ के नाम या मोहिमेच्या...

July 8, 2025 3:12 PM

views 32

राज्याच्या विविध भागात पाऊस

राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.  गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काल दिवसभर झालेल्या पावसामुळे तिरोडा तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पावसामुळे  जिल्ह्यातले २१ मार्गांवरची वाहतूक ठप्प झाल्यानं विद्यार्थ्यांची गैर...