July 9, 2025 3:40 PM

views 44

विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, बचावकार्य सुरू

विदर्भात बहुतांश जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून अनेक रस्ते बंद झाले आहेत तसंच नद्या आणि नाले दुथडी भरुन वाहत आहेत. वर्धा इथं यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा ते राळेगाव रस्ता बंद झाला आहे. नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं बचाव कार्य सुरू केलं आहे. नागपूर रे...

July 9, 2025 1:12 PM

views 36

टेक्सासमध्ये पुरामुळे १०९ जणांचा मृत्यू, १६०हून बेपत्ता

अमेरिकेच्या टेक्सासला पुराचा जोरदार तडाखा बसला असून आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यू झाला असून १६० हून अधिक जण बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबट यांनी दिली. ग्वाडालूपे नदीत शोधमोहीम सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भितीही त्...

July 9, 2025 1:07 PM

views 21

बांगलादेशी वस्तूंवर ३५ टक्के नवीन कराची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशी वस्तूंवर ३५ टक्के नवीन कराची घोषणा केली आहे. हा कर १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. या आधी एप्रिलमध्ये अमेरिकेनं बांगलादेशी वस्तूंवर ३७ टक्के कराची घोषणा केली होती. याचा जास्त फटका बांगलादेशाच्या कपड्यांच्या व्यापाराला बसेल कारण मुख्य प्रतिस्पर्धी व्हिएत...

July 9, 2025 3:30 PM

views 29

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नामिबिया इथं पोहोचले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात नामिबियाच्या विंडहोकमध्ये पोहोचले आहेत. नामिबियाचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यापार मंत्री सेल्मा अशिपाला-मुसवी यांनी होसेआ कुटाको आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्वागतासाठी पारंपरिक गरबा नृत्य सादर करण्यात...

July 9, 2025 9:49 AM

views 44

निष्क्रीय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे निर्देश बँकांना नाहीत – अर्थ मंत्रालय

निष्क्रीय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे कोणतेही निर्देश बँकांना दिलेले नाहीत, असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं काल स्पष्ट केलं. वित्तीय सेवा विभागानं अशी खाती बंद करायला सांगितल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. निष्क्रीय जनधन खात्यांच्या सं...

July 9, 2025 9:23 AM

views 25

राज्यातल्या ITI संस्थाच्या आधुनिकीकरणासाठी परदेशी पतसंस्थांद्वारे १२० कोटींची गुंतवणूक

बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन यांच्या दरम्यान काल एक सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील पतसंस्था १२० कोटी रूपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहेत. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्...

July 9, 2025 9:04 AM

views 18

दिल्लीतल्या शाळांमध्ये स्मार्ट वर्गखोल्यांसाठी ९०० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर

दिल्ली सरकारनं दिल्लीतल्या शाळांमध्ये स्मार्ट वर्गखोल्यांसाठी 900 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मंजूर केली आहे. तसंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यालाही मंजुरी दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. दिल्लीचे ...

July 9, 2025 8:56 AM

views 23

बालकांसाठीच्या हिवताप विरोधी उपचार पद्धतीच्या वापराला मान्यता

तान्ह्या बाळांसाठी आणि बालकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जगातल्या पहिल्या हिवताप उपचारपद्धतीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. नोवार्टिस या फार्मा कंपनीला हिवतापावरच्या ‘कोआर्टेम’ नावाच्या नवीन औषधाला स्विस अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे. हिवतापामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये पाच वर्षांखालील मुलांचं प्रम...

July 9, 2025 9:26 AM

views 41

राज्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं पुराची शक्यता ल...

July 8, 2025 8:18 PM

views 37

विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरुन विरोधक पुन्हा आक्रमक, सरन्यायाधीशांना निवेदन

विधानसभेतल्या विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज पुन्हा उपस्थित केला. न्यायमूर्ती गवई यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रम पत्रिकेत विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख नसल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. यावर, अध्यक्ष राहुल नार्वेक...