August 5, 2026 7:47 PM

printer

बाल लैंगिक शोषण, डिपफेक आशयावरून मेटाची सरकारकडे माफी

मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री, डिपफेक आशय आणि मेटाच्या कार्यप्रणालीतल्या त्रुटींबाबत सरकारची माफी मागितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विशिष्ट प्रकारच्या आशयाला प्रोत्साहन देण्यासाठी भरपूर पैसे खर्च केल्याची कबुली मेटानं दिली आहे. मेटा हे व्यासपीठ ‘मध्यस्थ’ नसून कोणत्या व्यक्तीपर्यंत कोणता आशय पोहचवायचा याची निवड ते स्वतः करत असल्याचं, सरकारनं स्पष्ट केलं आहे.