August 6, 2026 10:04 AM

printer

केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत आढावा

केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि प्राधान्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली, असं जोशी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबर शिक्षणाचा दर्जा, प्रवेशाच्या संधी आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही काल चर्चा करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याचं सबलीकरण करणारी भविष्यवेधी शिक्षण यंत्रणा उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं जोशी यांनी स्पष्ट केलं.