झारखंडमध्ये पश्चिम सिंघभूम जिल्हा पोलिसांनी सरंडा, कोल्हान आणि पोराहाट वनविभाग पूर्णतः नक्षलमुक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. तिथल्या ४ माओवाद्यांनी नुकतंच आत्मसमर्पण केलं होत. गेल्या वर्षाभरात तिथल्या ५२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं , १८ नक्षलवादी चकमकीत ठार झाले तर २९ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याचं सिंघभूमचे पोलीस महासंचालक अनुरंजन किस्पोटा यांनी वार्ताहरांना सांगितलं. चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि स्फोटक पदार्थ हस्तगत केल्याचं त्यांनी सांगितलं.
News On AIR | August 11, 2026 7:42 PM
झारखंडमधील तीन वनक्षेत्रे नक्षलमुक्त घोषित