September 30, 2024 9:32 AM

views 51

भारतातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील ४ ते ५ दिवस ईशान्य भारतातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये तुरळक ठिकाणी आज तर आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.

September 28, 2024 2:25 PM

views 126

महाराष्ट्रासह गुजरात, पश्चिम बंगालचं उप हिमालयीन क्षेत्र, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रासह गुजरात, पश्चिम बंगालचं उप हिमालयीन क्षेत्र, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तराखंडात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात उद्याही पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पुढील २-३ दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

September 26, 2024 3:47 PM

views 53

पालघर आणि नाशिकमध्ये उद्या सकाळीपर्यंत ‘रेड अलर्ट’

हवामान विभागानं उद्या सकाळी साडे ८ वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे, रायगड तसंच पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे. राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

September 24, 2024 10:37 AM

views 62

कोकण, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी लगतच्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा

कोकण, कर्नाटक आणि गोवा या सागरी किनारपट्टी लगतच्या राज्यांना आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर उत्तर कर्नाटक,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.   केरळ, आंध्रप्रदेश किनारपट्टी, रायलसीमा, तेलंगण, गुजरात, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, माणिपूर, मिजोरम, त्रिपुरा, मध्यप्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढ मध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

September 21, 2024 2:12 PM

views 60

येत्या काही दिवसांत देशातल्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा

येत्या काही दिवसांत देशातल्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. ओदिशात उद्यापासून मंगळवारपर्यंत तर नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड आणि मेघालयात गुरुवारपर्यंत जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भातही या काळात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम आणि दक्षिण द्वीपकल्प भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील तर पुढच्या आठवड्याच्या मध्यावर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात जोरदार पा...

September 19, 2024 1:17 PM

views 60

उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज

पुढच्या तीन दिवसांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या विविध भागांमध्ये येत्या २४ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या आठवड्यात कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

September 8, 2024 1:52 PM

views 69

तेलंगणाच्या खम्मम आणि महबुबाबाद या पूरबाधित जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

तेलंगणाच्या खम्मम आणि महबुबाबाद या पूरबाधित जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत महबुबाबाद इथे १८२ मिलीमीटर तर खम्मममधल्या तल्लाडा इथे १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांसाठी सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं या दोन जिल्ह्यांसह इतर दोन जिल्ह्यांना येत्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट तर आणखी दहा जिल्ह्यांना मध्यम पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आगामी पाच दिवसांमध्ये राज्यात तुरळक...

September 8, 2024 1:50 PM

views 53

देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा

देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेशाचा किनारी भाग आणि यानम इथे आज अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओदिशा इथे उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मध्य प्रदेश, छत्तीसगड , कोकण, गोवा , विदर्भ , कर्नाटकाचा किनारी भाग आणि पूर्व उत्तर प्रदेश इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

September 7, 2024 8:22 PM

views 72

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागानं ओदिशा, आंध्र प्रदेशाचा  किनारी भाग आणि  तेलंगणा मध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.  आगामी तीन दिवसांत तेलंगण, ओदिशा आणि  मध्‍य महाराष्ट्रात  अत्‍यधिक ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  ईशान्य भारतात आगामी सात दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरल, माहे, दक्षिण कर्नाटक तसंच कर्नाटकचा किनारपट्टीकडचा भाग इथे येत्या सोमवारपर्यंत तर मध्य प्रदेशात आगामी  सात दिवसांपर्यंत हीच स्थिती राहू शकेल. या आठवड्यात  दिल्लीच्या  आसपास तसंच पश्चिम आणि  मध्य भारतामध्ये काही ठ...

September 4, 2024 4:02 PM

views 49

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   विदर्भात काही भागात पावसाची संततधार राहणार असून सातारा आणि पुणे तसंच, पश्चिम महाराष्ट्रातल्या घाटभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसह इतर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.