November 28, 2024 11:11 AM

views 47

येत्या शनिवारपर्यंत देशाच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता

नैऋत्य बंगालच्या उपसागरात, श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे येत्या शनिवारपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कमी दाबाच्या पट्टयाचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं. हे चक्रीवादळ शनिवारी सकाळच्या सुमारास उत्तर तामिळनाडू किनारपट्टीजवळ प पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मच्छीमारांनी बंगालच्या उपसागरात...

November 27, 2024 7:55 PM

views 39

गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट

राज्यात गारठा वाढला असून गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं ९ पुर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं.   नाशिकमध्ये १० पूर्णांक ६ दशांश अंश सेल्सियस तर निफाडमध्ये ८ पुर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस तापमान आज नोंदवलं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आ...

November 9, 2024 7:42 PM

views 50

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून, राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

October 19, 2024 2:09 PM

views 34

भारतात येत्या २ ते ३ दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

तामिळनाडू , पुदुच्चेरी, आणि कर्नाटक सह दक्षिण भारतात येत्या २ ते ३ दिवसात आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये २३ आणि २४ तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वायव्य, पश्चिम, मध्य आणि ईशान्य भारतात तुरळक प्रमाणात पाऊस पडेल. उत्तर अंदमान समुद्रात चक्रीवादळासदृश स्थिती तयार होऊ शकते, त्यामुळे बंगालच्या उपसागरात येत्या २२ तारखेला कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

October 14, 2024 8:17 PM

views 71

केरळमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी

केरळमधल्या कन्नुर जिल्ह्यात ऑरेंज तर इडुकी, मलप्पुरम, कोझीकोड आणि वायनाड जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत पावासाचा जोर आणखी वाढेल, असंही हवामान विभागाने कळवलं आहे.

October 14, 2024 9:36 AM

views 52

पुढील चार दिवसांत देशाच्या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील चार दिवसांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच येत्या आठवडाभरात गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड येथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   दरम्यान, नैऋत्य मान्सून बिहार, झारखंड, संपूर्ण पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, आसाम आणि मेघालयच्या उर्वरित भागातून परतला असल्याचं आयएमडीने म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून पुढील दो...

October 13, 2024 1:27 PM

views 61

पुढील पाच दिवसांत कर्नाटकच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील पाच दिवसांत कर्नाटकच्या दक्षिण भागात, केरळ, माहे, आणि तमिळनाडू येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा इथं पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तर गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि महाराष्ट्रातल्या काही भागांत मोसमी पावसाच्या परतीसाठी अनुकूल वातावरण राहील, असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. 

October 10, 2024 7:15 PM

views 33

राज्यात उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

राज्यात उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. कोल्हापुरात आज दुपारी वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे या पावसामुळे हाल झाले. पावसामुळे संपूर्ण शहर आणि परिसरात पाणी साचलं आहे.

October 6, 2024 1:10 PM

views 50

देशात काही भागात पावसाचा अंदाज

देशाच्या ईशान्य आणि दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. देशाच्या वायव्य, पश्चिम आणि मध्य भागात मात्र पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे, रायलसीमा, आणि कर्नाटकच्या किनारी आणि दक्षिणभागात पुढचे २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, कोकण, गोवा, मराठवाडा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची श...

October 1, 2024 3:36 PM

views 61

राज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत १२६ टक्के पाऊस

यंदाच्या हंगामात राज्यात १२६ टक्के पाऊस पडला. सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हिंगोली आणि अमरावती वगळता राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अहमदनगरमध्ये ४९ टक्के तर सांगलीत ४८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. जळगाव, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला. हिंगोलीमध्ये सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी तर अमरावतीमध्ये २ टक्के कमी ...