December 26, 2024 2:09 PM

views 31

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसंच ते माता वैष्णोदेवी आणि भेरोबाबा मंदिरात जाऊन दर्शनही घेणार आहेत. 

December 10, 2024 3:14 PM

views 43

राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचा अविश्वास ठराव

राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने अविश्वास ठराव मांडला आहे. विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारुन पक्षपात करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी हा प्रस्ताव मांडला असल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. लोकशाहीच्या रक्षणार्थ नाईलाजाने विरोधी आघाडीला हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

December 8, 2024 8:16 PM

views 23

भगवद्गीता हा ग्रंथ पूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

भगवद्गीता हा ग्रंथ पूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. हरयाणात कुरुक्षेत्र इथं गीता ज्ञान संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गीतामहोत्सवाला ते संबोधित करत होते. गेल्या १० वर्षात भारताने अभूतपूर्व प्रगती केली असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्जुनाचा निर्धार अंगी बाणवला पाहिजे असं ते म्हणाले.   

December 3, 2024 8:24 AM

views 32

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज राज्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते शतकमहोत्सवी स्तंभाचं उद्घाटन होईल. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हेदेखील या कार्यक्रमाला संबोधित करतील. संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ‘अमृतकाळात कापसावरची उत्पादनानंतरची प्रक्रिया’ या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजनही करण्यात आलं आहे.

October 19, 2024 8:03 PM

views 22

शिक्षण क्षेत्रातल्या बाजारीकरणामुळे शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शिक्षण क्षेत्रात झालेल्या बाजारीकरणामुळे शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम होत असल्याचं प्रतिपादन  उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी केलं आहे. राजस्थान मधल्या सीकर इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण हे कधीच उत्पन्नाचं साधन नव्हतं, तर ते त्यागाचं, परोपकाराचं आणि समाज सक्षम घडवण्याचं माध्यम होतं. शिक्षण क्षेत्राचा व्यवसाय होणं, हे राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनं पोषक नसल्याचं धनखड यावेळी म्हणाले. शिक्षण ही बाब एखाद्या वस्तूसारखी नफेखोरीसाठी विकली जात असून त्याचा शिक्षणाच्या गुणवत्तेवर दुष्परि...

September 27, 2024 8:03 PM

views 30

जगभरातल्या पर्यटकांना भारताचं आकर्षण असल्यानं इथं बारमाही पर्यटन शक्य – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

भारत हे जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षण असून इथे बारमाही पर्यटन शक्य असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यटनाचा विकास अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठा हातभार लावतो असं सांगून ते म्हणाले की २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात पर्यटन उद्योगाची महत्त्वाची भूमिका असेल.    केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, पर्यटन राज्य मंत्री सुरेश गोपी आणि इतर मान्यवर कार्य...

August 31, 2024 2:49 PM

views 34

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते देहरादूनमधल्या CSIR - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इथं शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. तसंच ते राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय आणि एम्स संस्थेलाही भेट देणार आहेत.

August 15, 2024 3:37 PM

views 61

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य दिन हा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या आदर्शांचा उत्सव असून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया आहे, असं धनखड आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सर्व नागरिकांना २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहनही धनखड यांनी या संदेशातून केलं.   मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, उच्च न्यायालय अशा ऐतिहास...