August 7, 2026 8:19 PM
34
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिरला यांनी येत्या ९ तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिरला यांन...