August 6, 2025 3:49 PM

views 50

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे, महागाई दराचा अंदाज आणखी घटवला

भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढाव्यानंतर व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रेपो दर साडे ५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. याशिवाय इतरही दर जैसे थे राहणार आहे.    चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन ३ पूर्णांक १ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. जूनमध्ये वर्तवलेल्या अंदाजात हा दर ३ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. खाद्यपदार्थांच्या दरात होत असलेली घसरण, शेती क्षेत्रात झालेल्या सुधारणा यामुळं महागाई दरा...

August 4, 2025 8:19 PM

views 93

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मुंबईत सुरु

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती येत्या बुधवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करेल. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पत पुरवठ्याला चालना देण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात होण्याची शक्यता भारतीय स्टेट बँकेनं वर्तवली आहे. मात्र सलग तीन वेळा व्याज दर कमी केल्यामुळे आता रिझर्व्ह बँक व्याज दरात बदल करणार नाही, असं मत काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

August 4, 2025 12:53 PM

views 77

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती येत्या बुधवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करेल. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पत पुरवठ्याला चालना देण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात होण्याची शक्यता भारतीय स्टेट बँकेनं वर्तवली  आहे. मात्र सलग तीन वेळा व्याज दर कमी केल्यामुळे आता रिझर्व्ह बँक व्याज दरात बदल करणार नाही असं मत काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

July 22, 2025 8:09 PM

views 46

देशाच्या वित्तीय समावेश निर्देशांकात वाढ होऊन तो ६७ टक्क्यावर

देशाच्या वित्तीय समावेश निर्देशांकात वाढ होऊन तो ६७ टक्के झाल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२४ मधे हा निर्देशांक ६४ पूर्णांक २ दशांश टक्के होता. शाश्वत आर्थिक साक्षरता उपक्रम, वित्तीय समावेशन आणि उत्तम गुणवत्ता यामुळे ही वाढ झाल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. वित्तीय सेवा  किती सहज उपलब्ध आहेत हे ऍक्सेस पॅरामिटरमधून दिसतं तर या सेवांचा वापर किती परिणामकरित्या होतो हे यूसेज पॅरामीटरमधून दिसतं असं रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटलं आहे. 

July 3, 2025 1:02 PM

views 81

कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

     कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. गैर व्यावसायिक कर्ज घेणाऱ्यांकडून अशा प्रकारचे शुल्क कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थेने घेऊ नये असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. येत्या आर्थिक वर्षापासून यासंदर्भातले दिशा निर्देश लागू होणार आहेत.   सरकारी आणि खासगी बँका, सहकारी बँका, गैर बँकिंग वित्तीय संस्था यांना हे दिशानिर्देश लागू होतील. कर्जाचा पूर्ण किंवा अंशतः भरणा केला तरी तसंच कुठल्याही किमान कालावधीच्या अटीशिवाय हे दिशा निर्देश ...

June 27, 2025 6:52 PM

views 55

RBI चे सात दिवसांच्या व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो लिलावाचे निकाल जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेनं सात दिवसांच्या व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो लिलावाचे निकाल आज जाहीर केले. या लिलावासाठी आरक्षित एक लाख कोटी रुपयांच्या रकमेपैकी ८४ हजार ९शे ७५ कोटी रुपयांची बोली लावली गेली आणि ही संपूर्ण रक्कम रिझर्व्ह बँकेनं स्वीकारली. व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो लिलाव हा बाजारपेठेतली अतिरिक्त रोख काढून घेण्याचा एक मार्ग आहे. बाजारपेठेतल्या व्याजदरांनुसार हे लिलाव घेतले जातात.

June 6, 2025 8:22 PM

views 125

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के कपात, शेअर बाजारात जोरदार तेजी

रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली आहे. आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे. फेब्रुवारीपासून सलग तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केली असून या कालावधीत रेपो दर एकूण १ टक्क्यानं कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात चलनफुगवट्याचा दर ३ पूर्णांक ७ दशांश टक्के पर्यंत आटोक्यात राहील असा सुधारित अंदाज पत धोरण समितीनं आढाव्यात व्यक्त केला आहे.   या आधी हा दर ४ टक्के राहील असा अंदाज होता. चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक वृद्धी...

June 6, 2025 7:36 PM

views 56

शेअर बाजारात रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला. सेन्सेक्स ७४७ अंकांनी वधारुन ८२ हजार १८९ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५२ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ३ अंकांवर स्थिरावला. बँका आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते.

May 30, 2025 1:21 PM

views 71

वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल – RBI

चालू आर्थिक वर्षात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. सरकारचा भांडवली खर्चावर भर, खासगी क्षेत्राची वाढ, बँका आणि भांडवली बाजारांचा अचूक ताळेबंद यामुळे भारताची अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहिल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. उत्पादन क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात वाढ अपेक्षित आहे. यासाठी सरकार सकारात्मक धोरण राबवत असल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

May 23, 2025 7:02 PM

views 59

रिझर्व बँककडून यावर्षासाठी केंद्रसरकारला २ लाख ६८ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश जाहीर

भारतीय रिझर्व बँकेनं केंद्रसरकारला २ लाख ६८ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश २०२४-२५ या वर्षासाठी जाहीर केला आहे. बँकेच्या संचालकमंडळाची ६१६वी बैठक  आज मुंबईत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षते खाली झाली. त्यावेळी हा प्रस्ताव मंजूर झाला.    संचालक मंडळाने गेल्या १५ मे रोजी संमत केलेल्या सुधारित आर्थिक भांडवली निकषांनुसार ही रक्कम ठरवली असून त्यात अवलंबित जोखीम रक्षक कंटिंजंट रिस्क बफर साडेसात ते साडेचार टक्के पर्यंत  ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.