January 24, 2026 4:53 PM

views 116

देशातल्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार रहावं -मंत्री राजनाथ सिंह

जग अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात असल्याने देशातल्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार रहावं असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रीय छात्रसेनेच्या शिबिरात बोलत होते. एन सी सी केवळ संचलन आणि शिबिरापुरते मर्यादित नसून शिस्त आणि देशभक्ती अंगी भिनवण्यासाठी तसंच स्वयं सुधारणेसाठी एक मंच असल्याचं त्यांनी सांगितलं.

October 15, 2025 10:29 AM

views 64

संरक्षण मंत्री आज नवी दिल्लीत ब्राझीलचे उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन यांची भेट घेणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत ब्राझीलचे उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन यांची भेट घेणार आहेत. यावेळी ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोसे मुसिओ मोंटेइरो फिल्हो हे देखील उपस्थित राहणार  आहेत.   या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्रातील बहुआयामी संबंधांचा आढावा घेतला जाईल. तसंच दोन्ही नेते लष्करी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्य यासारख्या क्षेत्रांबद्दलही सविस्तर चर्चा करतील, असं संरक्षण मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.     

September 21, 2025 2:43 PM

views 88

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मोरोक्कोच्या दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मोरोक्कोच्या दौऱ्यावर जात आहेत. संरक्षणमंत्र्यांचा हा उत्तर आफ्रिकी राष्ट्राचा पहिलाच दौरा असेल. या दौऱ्यात मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्देलतिफ लौदीयी यांच्यासोबत संरक्षण, धोरणात्मक आणि उद्योग सहकार्य मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय बैठक होणार आहे. तसंच बेरेचिड इथं टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स मोरोक्कोच्या व्हीलड आर्मर्ड प्लॅटफॉर्मसाठीच्या नवीन उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. आफ्रिकेतला हा पहिलाच भारतीय संरक्षण उत्पादन संयंत्र प...

August 23, 2025 10:27 AM

views 43

एक मजबूत संरक्षण यंत्रणा देश तयार करत आहे- संरक्षणमंत्री

नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला प्रोत्साहन देऊन आणि स्थानिक कंपन्यांना वाढीसाठी पोषक वातावरण तयार करुन एक मजबूत संरक्षण यंत्रणा देश तयार करत आहे, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केलं.   पाचव्या पिढीचं लढाऊ विमान आणि विमानांचं इंजिन तयार करणं तयार करायच्या दिशेनं भारताचा प्रवास सुरू आहे, असंही सिंह यांनी सांगितलं. सर्व परदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी भारतातल्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

July 14, 2025 9:53 AM

views 70

ऑपरेशन सिंदूरमधील उल्लेखनीय कामगिरीमुळं ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जागतिक स्तरावर वाढती मागणी

ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे, जगभरात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मागणी वाढली असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल सांगितलं.   लखनौ इथं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांच्या पुतळ्याचं अनावरण सिंग यांच्या हस्त झालं त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या 14 देशांनी याविषयी चौकशी केल्याचे सांगून, लखनौ इथून आता क्षेपणास्त्राची निर्यात होऊ शकेल ज्यामुळे रोजगारवाढीस मदत होईल असेही ते यावेळी म्हणाले.

July 2, 2025 9:21 AM

views 72

दहशतवादाला प्रत्युत्तर, बचाव आणि सीमेपलीकडच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्याचा भारताला अधिकार : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याचा, बचाव करण्याचा आणि सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यांना प्रतिबंध करण्याचा भारताला अधिकार आहे; असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने मोजून मापून कारवाई केल्याचं सांगून त्यात कोणताही अतिरेक नव्हता तसंच ती प्रमाणबद्ध आणि दहशतवादी पायाभूत सुविधा निष्क्रिय करण्यावर केंद्रित होती असं सांगितलं. सिंग आणि हेगसेथ यांनी भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक ...

January 1, 2025 1:54 PM

views 66

२०२५ हे वर्ष संरक्षण क्षेत्रासाठी सुधारणा वर्ष असेल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची घोषणा

संरक्षण क्षेत्रात सध्या सुरु असलेल्या आणि नव्यानं सुरु केल्या जाणाऱ्या सुधारणांना गती देण्याच्या उद्देशानं २०२५ हे वर्ष सुधारणांचं वर्ष असेल, असं संरक्षण मंत्रालयानं घोषित केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्रालयातल्या सचिवांसोबत बैठक घेऊन विविध महत्वपूर्ण योजना, प्रकल्प आणि भविष्यातल्या उपक्रमांचा आढावा घेतला. देशाच्या सशस्त्र दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात हे वर्ष ऐतिहासिक ठरेल, देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये यावर्षी अभूतपूर्व वाढ दिसून येईल, अस...

September 11, 2024 6:12 PM

views 83

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याने आपल्या परदेश दौऱ्यादरम्यान अशी निराधार आणि दिशाभूल करणारी वक्तव्यं करणं हे लज्जास्पद असून देशाच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारं आहे, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. भारतात शिख समुुदायाला त्यांच्या धार्मिक रितीरिवाजाचं पालन करू दिलं जात नाही या गांधी यांचा आरोप तथ्यहीन आणि सत्यापासून कोसो दूर असल्याचंही सिंह म्हणाले.