September 5, 2024 7:54 PM

views 46

शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण द्यावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं.    शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या विज्ञान भवन इथं देशभरातल्या ८२ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर अधिक भर देण्यात आला असून त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो, असं सांगताना राष्ट्रपतींनी शिक्षण क्षेत्र सर्वसमावेशक केल्याबद्दल शिक्षकांचं कौतुक केलं.    र...

September 5, 2024 9:51 AM

views 51

महिलेवरील अत्याचारासाठी फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपतींना विनंती

महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातल्या गुन्ह्यांसाठी ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. डॉक्टर गोऱ्हे यांनी काल मुंबईत राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन सादर केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरोपींकडून आलेले दयेचे अर्ज अनेकदा प्रलंबित राहतात आणि त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही ...

September 3, 2024 8:29 PM

views 78

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

महाराष्ट्र विधान परिषदेनं स्थापनेपासून आत्तापर्यंत गेल्या १०३ वर्षांमध्ये इथल्या लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम केलं आणि जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले आहेत. त्या आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या सभागृहानं वादविवाद आणि संवादाची परंपरा कायम ठेवून लोकशाही मजबूत केली, असं त्या म्हणाल्या.   राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष कर...

September 3, 2024 6:43 PM

views 56

विद्यार्थीनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

राष्ट्रपतींनी आज पुण्यात सिम्बायोसिस विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित केलं. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थीनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करायला हवं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशाच्या विकासात महिलांचा अविभाज्य वाटा असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.    दीक्षांत समारंभात सुवर्णपदक विजेत्या ११ जणांमध्ये ८ विद्यार्थिनी आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लैंगिक समानतेवर भर देऊन सर्वसमावेशक विकासासाठी विद्यापीठ करत असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली.    ...

September 2, 2024 7:02 PM

views 50

कार्यप्रणालीत बदल करुन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

सहकारी संस्थांनी कार्यप्रणालीत बदल करावे, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. कोल्हापूरच्या वारणानगर इथं श्री वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आणि वारणा विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. सहकार क्षेत्राच्या संपूर्ण क्षमतेचा वापर अद्याप झालेला नाही. या संस्थांनी व्यवस्थापनात अचूकता आणावी, यासाठी अधिकाधिक युवांना या क्षेत्राशी जोडू...

September 2, 2024 1:18 PM

views 55

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज त्यांनी कोल्हापूर इथं महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेतलं. राष्ट्रपती मुर्मू आज वारणानगर इथं श्री वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.   उद्या त्या पुण्यात सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या २१व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील. तसंच महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात भाग घेतील. दौऱ्याच्या शे...

September 2, 2024 9:38 AM

views 49

न्यायालयांमधला खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

  न्यायलयांमध्ये वर्ग खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी उपाय शोधले पाहिजेत, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केलं आहे. दिल्लीत आयोजित जिल्हा न्याय पालिकेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या. न्यायालयासमोर प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणं हे न्याय व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान आहे. दाखल खटले 32 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणं हा गंभीर मुद्दा असून त्यावर साकल्यानं विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   ...

September 1, 2024 6:46 PM

views 76

सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापनेपासून गेल्या ७५ वर्षांमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या न्यायव्यवस्थेचा पहारेकरी म्हणून अमूल्य योगदान दिलं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय न्यायशास्त्राचं स्थान उंचीवर नेऊन ठेवल्याचं सांगून यात योगदान देणाऱ्या सर्वांचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रप...

August 31, 2024 2:20 PM

views 79

दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची भाजपाच्या आमदारांची मागणी

दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालचं सरकार निष्प्रभ आहे, असा आरोप करत दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजेंदर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना याबाबत निवेदन दिलं. दिल्ली प्रशासनाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे आणि त्यामुळे लोकहिताच्या कामांवर परिणाम होत आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे.

August 28, 2024 6:51 PM

views 54

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं नगरपरिषदेनं उभारलेल्या बुद्ध विहाराचं येत्या ४ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उद्घाटन

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं नगरपरिषदेनं उभारलेल्या बुद्ध विहाराचं उद्घाटन येत्या ४ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. उदगीरमधे तळवेस इथं बुध्द विहाराचं बांधकाम केलं आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गी इथल्या बुध्द विहाराची ही प्रतिकृती आहे. उद्घाटन समारंभाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.