December 29, 2025 1:31 PM

views 70

ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत. आज त्या  जमशेदपूर इथं ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाल्या. संथाली भाषेसाठी पंडित रघुनाथ मुर्मू यांनी सुरू केलेल्या 'ओल चिकी' चळवळीला १०० वर्ष झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.  त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जमशेदपूरच्या १५ व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती उद्या मुर्मू गुमला इथं आंतरराज्यीय जनसांस्कृतिक समारंभाला भेट देतील.  

December 21, 2025 8:40 PM

views 82

जी राम जी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी

विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका अभियान ग्रामीण, म्हणजे जी राम जी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. मनरेगा योजनेची जागा घेणारा हा कायदा एका आर्थिक वर्षात ग्रामीण भागतल्या प्रत्येक कुटुंबात १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देतो. गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केलं होतं. ग्रामीण भागात आत्मनिर्भरता, समृद्धी , सर्वसमावेशक विकास आणि सक्षमीकरण ही या कायद्याची उद्दिष्टं आहेत. हा कायदा ग्रामीण भारताच्या विकासातला मैलाचा दगड ठरेल असं ग्रामविकास मंत्र...

December 19, 2025 1:32 PM

views 69

लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेत राष्ट्रपतींचं संबोधन…

बदलत्या तंत्रज्ञानातली आव्हानं ओळखून जागतिक दर्जाचे सनदी अधिकारी घडवण्यावर लोक सेवा आयोगांनी लक्ष केंद्रित करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. हैद्राबादमध्ये आयोजित देशातल्या लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेचं उदघाटन करताना त्या आज बोलत होत्या.   याआधी बोलताना तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि भरती वेळापत्रक काटेकोरपणे राबविण्यावर भर दिला होता. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अजय कुमार आणि इतर...

December 15, 2025 6:16 PM

views 77

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यपासून तीन राज्यांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून ७ दिवस कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगण या ३ राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कर्नाटकात मळवल्ली इथं आदि जगद्गुरु श्री शिवरथीश्वर शिवयोगी स्वामीजी यांच्या एकहजार ६६व्या जयंती उत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. येत्या १७ डिसेंबरला त्या तमिळनाडूत वेल्लोर इथं सुवर्णमंदिरात पूजा अर्चना करतील. सिकंदराबादच्या राष्ट्रपती निलायम मधे विश्राम केल्यानंतर त्या हैद्राबादमधे तेलंगण लोकसेवा आयोगाच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करतील.

December 11, 2025 8:16 PM

views 63

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मणिपूर दौऱ्यावर

मणिपूरमधल्या वांशिक हिंसाचारामुळे मणिपुरी जनतेला होणाऱ्या वेदनांची जाणीव मला असून राज्याची एकात्मता अबाधित राखून भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर असून आज त्या इंफाळ इथे एका कार्यक्रमात बोलत होत्या. हिंसाचाराचा बळी ठरलेल्या प्रत्येक कुटुंबाच्यामागे सरकार ठामपणे उभं आहे, असं त्या म्हणाल्या. मणिपुरच्या  खोऱ्यातल्या  तसेच  डोंगराळ भागातल्या सर्व समुदायांनी एकत्र येऊन राज्याच्या समृद्धीसाठी काम करण्...

December 3, 2025 12:33 PM

views 71

तिरुवनंतरपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल डेमोमध्ये राष्ट्रपती सहभागी होणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज केरळमधे तिरुवनंतरपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल डेमोमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. तिरुवनंतरपुरम जवळच्या षण्मुगम समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदल प्रात्यक्षिकं करणार आहे. राष्ट्रपती मुर्मू या आज दुपारी तिरुवनंतरपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. तिथून त्या कार्यक्रमासाठी रवाना होतील. या डेमोमधे १९ युद्धनौका आणि ३२ विमानं असतील. या प्रात्यक्षिकांमधून भारतीय नौदलाचं सामर्थ्य अधोरेखित होणार आहे. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती लोक भवन इथं जातील आणि उद्या सकाळ...

November 10, 2025 1:10 PM

views 67

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या संसदेला संबोधित करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोलाची राजधानी लुनाडामध्ये अंगोलाच्या संसदेला संबोधित करणार आहेत. अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लोरन्को यांच्याशी काल त्यांची विविध मुद्द्यांवर विस्तृतपणे चर्चा झाली. दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनीं द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. ऊर्जा, पायाभूत सुविधा, संरक्षण, आरोग्य, शेती आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्यावर त्यांनी भर दिला. यादरम्यान मत्स्यपालन, जलकृषी, सागरी संसाधन आणि इतर विषयांवर सहकार्य वाढवण्यासाठी समझोता करार करण्यात...

November 2, 2025 8:27 PM

views 101

राष्ट्रपतींच्या हस्ते उत्तराखंडमधे पादचारी पुलाचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज उत्तराखंडमधे देहरादून इथं पादचारी पुलाचं उद्घाटन केलं. यावेळी राज्यपाल गुरमीत सिंग आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ‘राष्ट्रपती निकेतन’ मधे आयोजित आंतरराष्ट्री साहित्य, संस्कृती आणि कला महोत्सवाला संबोधित करतील.

October 23, 2025 1:46 PM

views 73

विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी वंचित आणि मागास समुदायाला समान संधी मिळणं आवश्यक – राष्ट्रपती

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांना विशेष करून वंचित आणि मागास समुदायाला समान संधी मिळणं आवश्यक आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं. केरळमधल्या राजभवनात माजी राष्ट्रपती के आर नारायणन् यांच्या पुतळ्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.    के. आर. नारायणन् यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि उच्च लोकशाही मूल्यांचा वारसा ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं. नारायणन् यांनी राष्ट्र निर्माण आणि सर्वसमावेशक देशाच्या निर्मितीसाठी आपलं आयुष्...

October 21, 2025 9:26 AM

views 64

राष्ट्रपती मुर्मू आजपासून ४ दिवसांच्या केरळ दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून केरळच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे. राष्ट्रपती आज तिरुअनंतपुरम इथं पोहोचतील. त्या उद्या सबरीमला मंदिरात दर्शन घेणार आहेत. तिरुअनंतपुरम इथल्या राजभवन इथं गुरुवारी माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन पुतळ्याचं अनावरण त्या करतील. श्री नारायण गुरु समाधीच्या शताब्दी समारंभात देखील राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त पाला इथल्या सेंट थॉमस महाविद्यालय आणि एर्नाकुलम इथल्या सेंट टेरेसा महाविद्यालयामधील कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती सहभागी होतील. पोलिस हुतात्मा ...