November 29, 2024 10:19 AM

views 35

सायबर युद्ध, दहशदवादाला तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक – राष्ट्रपती

भारतीय सुरक्षा दलांवर केवळ देशाच्या सुरक्षेची जबाबदारी नसून सायबर युद्ध आणि दहशद वाद यासारखी नवी आव्हाने देखील असून त्यांना तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केल. तामिळनाडूतल्या वेलिंगटन इथल्या संरक्षण सेवा प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी अधिकारी आणि शिक्षकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. आजच्या जगात वेगाने बदलणाऱ्या भू-राजनैतिक वातावरणात सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या...

November 27, 2024 1:27 PM

views 52

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तामिळनाडूच्या चार दिवसीय दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तामिळनाडूच्या चार दिवसीय दौऱ्यावर असून या दौऱ्यासाठी त्यांचं कोइम्बतूर विमानतळावर आगमन झालं. त्या उद्या वेलिंग्टन उटी इथल्या संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी निलगिरी इथल्या आदिवासींशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी कोइम्बतूर आणि उटी परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

November 26, 2024 1:23 PM

views 47

संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. आपलं संविधान प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असून नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम याद्वारे होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतीशील आणि सर्वसमावेशक विचारांची पेरणी केली, असं त्या म्हणाल्या.  देशातल्या ...

November 14, 2024 8:32 PM

views 43

भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल – राष्ट्रपती

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.    जनजातीया गौरव दिवसांनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज देशवासीयांना संदेश दिला. देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचे योगदान महत्वाचे असून सध्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचंही त्या म्हणाल्या. देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे आणि त्यातही महिलांचे यो...

November 12, 2024 9:58 AM

views 42

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दादरा, नगर हवेली आणि दमण दीवच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती जामपूर इथलं पक्षीगृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दमण इथल्या एनआयएफटी संस्थेला भेट देतील. दुसऱ्या दिवशी त्या सिल्वासा इथल्या नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट देणार आहेत. आपल्या दौऱ्यात राष्ट्रपती विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधणार असून त्या झंडा चौक शाळेचं उद्घाटन आणि सिल्वासा इ...

November 6, 2024 8:13 PM

views 65

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या गोव्याला भेट देणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या गोव्याला भेट देणार आहेत. नौदलाच्या दर्यावर एक दिवस या कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. नौदलाच्या लढाऊ क्षमतेचं दर्शन घडवणाऱ्या कसरती आणि आएनएस विक्रांतवरुन झेपावणाऱ्या नौदल विमानांची प्रात्यक्षिकं यावेळी सादर होतील.

November 5, 2024 8:02 PM

views 52

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या ३ पुस्तकांचं प्रकाशन

न्यायव्यवस्थेनं निष्पक्ष समाजाच्या दिशेनं देशाची वाटचाल बळकट केली पाहिजे असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं. आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात सर्वोच्च न्यायालयाच्या ३ पुस्तकांचं प्रकाशन केल्यानंतर त्या बोलत होत्या. 'जस्टिस फॉर द नेशन' - सर्वोच्च न्यायालय, भारतातील कारागृहे यांच्या ७५ वर्षांचे प्रतिबिंब - मॅपिंग प्रिझन मॅन्युअल आणि लॉ स्कूलच्या माध्यमातून सुधारणा आणि कायदेशीर मदत - भारतातील कायदेशीर सहाय्य कक्षांच्या कार्याचा अहवाल अशी या ३ पुस्तकांची नावे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्...

November 5, 2024 7:35 PM

views 55

राष्ट्रपती भवनात आयोजित ‘सृजन २०२४’ निवासी कला शिबिरात अमरावतीतल्या सुमित्रा आहके सहभागी

राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या सृजन २०२४ या दहा दिवसांच्या निवासी कला शिबिरात अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातल्या सुमित्रा आहके सहभागी झाल्या होत्या. या शिबिरात सुमित्रा यांनी काढलेली वारली चित्रं, गाव आणि शहरातील फरक दर्शविणारं चित्र, देवस्वरुप मानला जाणारा वाघ आणि लुप्त होत चाललेले आदिवासी कलाप्रकार रेखाटले. शिबिरासाठी निवडलेल्या १५ जणांमध्ये सुमित्रा आहके यांना दुसरा क्रमांक मिळाला. शिबिराच्या समारोपावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी सुमित्रा आहके यांना प्रमाणपत्र, चषक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित ...

October 24, 2024 8:21 PM

views 63

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून दोन दिवसांच्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून दोन दिवसांसाठी छत्तीसगडच्या दौऱ्यावर जात आहेत. रायपूर इथल्या अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात त्या उद्या उपस्थित राहतील. नया रायपूर इथल्या पुरखौती मुक्तांगणलाही त्या भेट देणार आहेत.    भिलाईतल्या आयआयटीच्या शनिवारी होणाऱ्या चौथ्या दीक्षांत समारंभाला, तसेच रायपूरमधल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती आरोग्यविज्ञान आणि आयुष विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाला त्या उ...

October 19, 2024 10:42 AM

views 48

राष्ट्रपतींचा तीन अफ्रिकी देशांच्या दौऱ्याचा आज अखेरचा टप्पा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी आज मलावीतील सांस्कृतिक स्थळांना भेट देणार आहेत. काल राष्ट्रपतींनी त्यांचे समपदस्थ लाजरस चकवेरा यांच्याशी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. भारत आणि मलावीदरम्यान क्रीडा, युवा, औषधनिर्माण, कला आणि संस्कृती क्षेत्रात सहकार्यासाठी चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. भारतानं मलावीला एक हजार मेट्रिक टन तांदूळ आणि कर्करोगावरील उपचार सामग्री तसंच अवयव प्रत्यारोपण केंद्र उभारणीसह इतर वैद्यकीय मदत देण्यास...