August 4, 2026 8:25 PM

views 19

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी बसवली सौर ऊर्जा प्रणाली

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत ५० लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रह्लाद जोशी यांनी दिली.   या योजनेत १९ लाखांहून अधिक कुटुंबाचं वीजबिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमवरच्या संदेशात म्हटलं आहे.